नागपूरनांदेडराजकिय

नांदेड- जालना समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनामध्ये नांदेड तालुक्यातील बाधित शेतकरी यांना चार पट अधिक मावेजा मिळावा

नागपूर| येथील राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नांदेड दक्षिण मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मोहनराव हंबर्डे यांनी विधिमंडळात आज दिनांक 19/12/2023 रोजी विधान सभा नियम “औचित्य मुद्दा” उपस्थित केला, त्यामध्ये सदर प्रस्तावित नांदेड जालना समृद्धी महामार्गात नांदेड दक्षिण तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या सुपीक जमीन जात आहेत,वास्तविक शेतकरी हे वर्षानुवर्ष शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत असतात ,परंतु समृद्धी महामार्गत त्यांच्या जमिनी गेल्यामुळे त्यांची उदरनिर्वाह करण्याचे साधन कायमचे जाणार आहे.

 अनेक शेतकऱ्यांच्या शेतात विहीर,पाइपलाइन,बोअरवेल इत्यादी पाणी सुविधा असताना व बागायती निकष ठरताना मात्र प्रशासनातील काही अधिकारी मात्र शेतकऱ्यांच्या सात बाऱ्यात नोंद,नसणे किंव्हा वगळणे,ग्राह्य धरण्यात येत नसणे त्यामुळे शेतकऱ्याना मनस्ताप सहन करावा लागत आहे,पर्यायाने शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला अल्प प्रमाणात मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने सदर भागातील जमिनी यांच्या मोबदला चार पट अधिक देण्या बाबत निर्णय घ्यावा.

तसेच या प्रस्तावित महमार्गाला जाणाऱ्या जमिनी या नांदेड महानगर पालिकेच्या हद्दीच्या अगदी जवळून जात आहेत,त्यामुळे या जमिनीचे मूल्यांकन करतांना शासनाने बाजार भावा प्रमाणे करावे व मार्केट रेट आज सुमारे चार ते पाच कोटी रुपये एवढा असून शासन मात्र 30 ते 35 लाख रुपांपर्यंतचे मूल्यांकन करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करत आहेत,

त्यामुळे शासनाने तातडीने नांदेड दक्षिण मतदार संघातील” नांदेड जालना,समृद्धी महामार्गातील ” बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मावेजा बाजार भावा प्रमाणे देणे बाबत तातडीने कारवाई करावी अशी अक्रमक मागणी आमदार मोहनराव हंबर्डे यांनी केली. त्यामुळे आता शासन नांदेड जालना समृद्धी महामार्गातील बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत नक्की किती पट देणार हे ही पाहणे उत्सुकतेचे ठरेल. त्यामुळे नांदेड दक्षिण मतदार संघातील आमदार मोहनराव हंबर्डे यांनी शेतकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर विधान सभेत न्याय देण्यासाठी सरकारकडे विनंती केली,त्यामुळे महामर्गातील बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे आर्थिक मदत बाजार भावा प्रमाणे,चार पट अधिक मिळण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत , त्यामुळे आमदार यांनी शेतकऱ्यांच्या विषयाला वाचा फोडल्यामुळे, सामान्य शेतकऱ्यांमधून हंबर्डे यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे,

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!