हिमायतनगर,अनिल मादसवार। तालुक्यातील पवना ग्रामपंचायत अंतर्गत डोंगराच्या पायथ्याशी व तलावाच्या जवळ असलेल्या दस्तगीरवाडी या आदिवासी वस्ती असलेल्या गावच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील कार्यरत शिक्षक अनियमित शाळेला येत असतात, आणि पगार मात्र नियमित उचलल्या जात होती. त्यामुळे नेहमी शाळेला दांडी मारणाऱ्या शिक्षकांसह त्यांना पाठीशी घालणाऱ्या केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांवर कारवाई करुन शाळेला नियमित शिक्षक द्यावा, या मागणीसाठी येथील शिक्षणप्रेमी राजकुमार राऊत यांनी १४ डिसेंबर पासून गटविकास अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे.
दरम्यान उपोषणाच्या दिवशी गटविकास अधिका-यांच्या समोर गटशिक्षणाधिकारी यांनी कारवाईस्तव वरिष्ठांकडे अहवाल पाठविण्याचे आश्वासन दिले होते. परतू उपोषणकर्त्यांनी तिन महिन्यांपुर्वी उपोषण करण्याचा इशारा दिला होता. उपोषणास बसल्यानंतर १७ सप्टेंबर रोजी गटशिक्षणाधिकारी यांनी आश्वासन दिल्याने उपोषणाची सांगता झाली. शिक्षकांसह कोणालाही निलंबित केले नसल्याने अखेर आमरण उपोषण सुरू करण्याची वेळ आली असल्याचे उपोषणकर्त्याचे म्हणणे आहे.
हिमायतनगर तालुक्यातील दस्तगीरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवरील कार्यरत असणाऱ्या शिक्षीका शाळेवर अनियमित येतात. काही महिने तर त्यांनी आपल्या जागेवर दुसन्या एका महिलेला मानधन देऊन त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना विद्यादान देण्याचे काम करून घेतले होते. सदर शिक्षीका शाळेवर येत नसल्याचे जिओ टेग फोटोसंह वरिष्ठांकडे तक्रार दिली असल्याचे उपोषण करताना सांगितले आहे.
तक्रार करुनही चौकशी करून दोषी असल्याचे आढळून आल्यानंतरही शिक्षीकेसह कोणावरही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे शिक्षणप्रेमी राजकुमार राऊत यांनी १४ डिसेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. दिलेल्या इशाऱ्यानुसार आमरण उपोषण सुरू झाल्यानंतर ३ ते १२ जुलै या काळात सदर शिक्षीकेने विनापरवाना गैरहजर राहुन पगार उचलल्याचे चौकशीत आढळून आले. त्यामुळे त्यांच्याकडून सहा दिवसांचे पगार ११ डिसेंबर रोजी जमा करून घेण्यात करण्यात आले असल्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी सांगितले.
गटविकास अधिकारी सुधीश मांजरमकर यांच्यासह गटशिक्षणाधिकारी शिवानंद शिवाचार्य यांनी १५ डिसेंबर रोज उपोषणकर्त्यांची भेट घेऊन केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी याच्यावर कारवाई करण्यासाठी अहवाल परिष्ठांकडे पाठविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र शिक्षकासह केंद्र प्रमुख, विस्तार अधिकार यांना निलंबित केल्याशिवाय उपोषणाच सांगता करणार नसल्याचे राजकुमार राऊत यांनी सांगुन उपोषण सुरूच ठेवले आहे.