नांदेड। उप विभागीय पोलीस अधिकारी (इतवारा) गुन्हे शोध पथकाची लागोपाठ तिसरी उल्लेखनिय कामगिरी.
नवीन नांदेड:- ऊप विभागीय पोलीस अधिकारी ईतवारा गुन्हे शोध पथकाने ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत तिसरी गावठी पिस्टल जप्त करून तिन गावठी पिस्टल, काडतुसे जप्त केली असून तिन आरोपींना अटक केली आहे, काल केलेली बिलाल नगर नांदेड येथून एका आरोपीस अटक करून एक पिस्टल जप्त करून धाडसी कार्यवाही केली आहे, या कामगिरी बदल वरीष्ठ अधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.
उपविभागीय कार्यालय यांच्या वतीने प्रसिद्धी केलेल्या पत्रकात, श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड,अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड आदेशाने आगामी लोकसभा निवडणुक अनुषंगाने रेकॉर्ड वरील पाहिजे, फरारी आरोपीतांचा शोध घेवुन अवैध धंद्यावर कार्यवाही करणे व संशईत हालचालीवर लक्ष ठेवणे करीता आदेशीत केल्याप्रमाणे सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग इतवारा यांच्या मार्गदर्शन व सुचनेवरुन उपविभाग इतवारा गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार पोना
अर्जुन मुंडे,पोकों चंद्रकांत स्वामी, संतोष बेल्लुरोड, श्रीराम दासरे,
वजीराबाद गुन्हे शोध पथकाचे पोकों भाऊसाहेब राठोड, अंकुश पवार, शेख इम्रान,बालाजी कदम यांनी संयुक्तरीत्याकाल दिनांक 27 मार्च 24 रोजी 03 .55 वाजताच्या सुमारास गल्ली क्रमांक 05, बिलाल नगर नांदेड क्वॉलिटी हॉटेल जवळ मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन छापा टाकुन आरोपी नामे शेख शाहीद रा. बिलाल नगर, नांदेड यास ताब्यात घेवुन त्याच्या ताब्यातील विनापरवाना बेकायदेशीर बाळगलेले 01 गावठी पिस्टल जप्त केले आहे.
यावरुन पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण गुन्हा नोंद क्रमांक 249/2024 कलम 3/25 शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास सपोनि श्री सचिन गढवे करीत आहेत.सदर कार्यवाही बाबत श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड, अबिनाश कुमार,अपर पोलीस अधिक्षक नांदेड व ईतर वरिष्ठांनी गुन्हे शोध पथक उपविभाग इतवारा यांचे कौतुक केले आहे.