उस्माननगर, माणिक भिसे। गटसाधन केंद्र कंधार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ५१ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उस्माननगर येथील जिल्हा परिषद कन्या शाळेतील उपक्रमशील, कलानिष्ठ सहशिक्षक अनिरुद्ध सिरसाळकर गुरूजी यांच्या मार्गदर्शनाखाली ( मोठ्या गटातून) सहावी ते आठवी गटातील दोन मुलींनी उत्कृष्ट सोलार ऊर्जा व त्यावर चालणारी कार या प्रयोगाचे सादरीकरण उत्कृष्टपणे स्पर्धेत दाखवून तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावून तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात बाजी मारली असून सादर केलेल्या प्रयोगाला प्रथम क्रमांक मिळविला आहे.
पंचायत समिती गटसाधन केंद्र कंधार यांच्या वतीने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रदर्शनाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी श्री.संजय येरमे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी श्री. मलगिरवार , श्री .मनोजवार, केंद्रप्रमुख जयवंतराव काळे ,आदीची उपस्थित होती. उस्माननगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेसह विद्यार्थी ,विद्यार्थ्यांनीचे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील जवळपास ३० ते ३५ शाळेने सहभाग घेतला होता . जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रदर्शनातून दोन्ही गटातून तीन नंबर काढण्यात आले.
सहावी ते आठवी गटातील जिल्हा परिषद कन्या शाळा उस्माननगर येथील विद्यार्थीनींनी श्री अनिरुद्ध सिरसाळकर गुरूजी यांच्या मार्गदर्शनाखाली कु. अक्षरा मोरे ,व गायत्री जाधव या दोघींनी मिळून सोलार ऊर्जा व त्यावर चालणारी कार या प्रयोगाचे सादरीकरण उत्कृष्टपणे स्पर्धेत दाखवून तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.शिक्षकांसाठी असलेल्या साहित्य निर्मितीतून प्रथम क्रमांक अनिरुद्ध सिरसाळकर गुरूजी यांचा आला आहे.
ऐनवेळी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तर दिले. सोलार ऊर्जा व त्यावर चालणारी कार या प्रयोगाला शिक्षक व परिक्षकांनी दाद दिली. सादर केलेल्या प्रयोगाला अधिकारी व परिक्षकांनी प्रयोगाचे कौतुक केले.तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.विद्या वांगे ,सौ.मंजुषा देशमुख ,सोनकांबळे, पांडागळे ,आदी शिक्षकांनी सहकार्य केले.व विद्यार्थीचे अभिनंदन केले आहे.