धर्म-अध्यात्मनांदेड

उस्माननगर येथे अखंड दत्त नाम सप्ताह व दत्त प्रकट दिन सोहळ्याचे आयोजन

उस्माननगर, माणिक भिसे। दरवर्षी प्रमाणे याही वर्षी उस्माननगर ( मोठी लाठी ) ता.कंधार येथील दत्त मंदिरात श्री दत्तनाम सप्ताह श्री. १०८ कैवल्यवाशी श्री गंभीरबन महंत महाराज कोलंबी यांच्या कृपा आशीर्वादाने आयोजित केला आहे.व तपोनिधी श्री संत गुरुवर्य शंकरबन महाराज गुरु अमृतबन महाराज मठ संस्थान इसाद ( उस्माननगर,मोठी लाठी ) यांच्या मार्गदर्शनाखाली २० डिसेंबर ते २७ डिसेंबर२०२३ दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.

अखंड दत्तनाम सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम सकाळी ७ ते ८ बाळक्रिंडा ग्रंथांचे पारायण , सकाळी १० ते १२ महापुजा , दुपारी २ ते ४ पोथी , सायंकाळी ६ ते ९ महापुजा , रात्रीला नामवंत, विनोदाचार्य किर्तनकारांचे किर्तन होईल.याप्रसंगी दि.२० डिसेंबर रोजी बुधवारी रात्री किर्तनकार आनंदबन महाराज तुपा ,दि.२१ डिसेंबर रोजी गुरूवारी चंद्रकांत महाराज लाठकर ,दि २२ डिसेंबर रोजी शुक्रवारी वेदांताचार्य दिगंबर महाराज वसमतकर ,दि.२३ डिसेंबर रोजी शनिवारी अविनाशबन महाराज कोलंबी , दि.२४ डिसेंबर रोजी रविवारी मुक्ताई नाथ माऊली उदगीर ,दि. २५ डिसेंबर रोजी सोमवारी श्यामसुंदर गिरी महाराज आष्टी ,दि.२६ डिसेंबर रोजी मंगळवारी आनंद दत्त महापुजा श्री. १०८ महंत यदुबन महाराज कोलंबी यांच्या हस्ते होईल. दुपारी ठीक१२ वाजता दत्त प्रगट सोहळा उत्साहात पार पडणार आहे.

२ वाजता सार्वजनिक महाप्रसाद व पंगतीचे आयोजन केले आहे.व रात्री ९ ते ६ पर्यंत श्री.श्री. १०८ महंत यदुबन गुरू गंभीर बन महाराज यांच्या हस्ते महापुजा होईल.दि.२७ डिसेंबर रोजी बुधवारी सकाळी ठीक ६ वा. काकडा आरती होईल.व गावातील प्रमुख रस्त्यांने पालखी सोहळा निघेल , दुपारी १ वा. दहीहंडी काला तपोनिधी श्री संत गुरूवर्य शंकरबन महाराज यांच्या हस्ते होणार आहे तरी परिसरातील भक्तमंडळी यांनी अखंड दत्तनाम सप्ताह व दत्त प्रगट दिन सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक वैराग्यमुर्ती श्री. संत अवधुतबन गुरू शंकरबन महाराज व समस्त गावकरी मंडळी यांनी केले आहे.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!