हदगाव, शे.चांदपाशा| आता आँनलाईन काढण्यात येणारा सातबारा उतारा व फेरफार नोंदीची शासकीय दर वाढविण्यात आलेले असुन, यापुर्वी हदगाव तालुक्यात १५ रुपायाना मिळणार सातबारा आता आँनलाईन २५ रुपायांना मिळणार आहे. ह्यामुळे दुष्काळात तेरावा महीना म्हणण्याची वेळ आली आहे. आता पेपरलेस कारभार आता मणी लेस झाल्याच दिसुन येत आहे. शेतकरी या विषयी संताप व्यक्त करतांना दिसुन येत आहे.
या बाबतीत मिळालेल्या माहीती अशी की, फेरफार नोंदी करिता फ्री अर्ज करुन घेता येत होता. आता ह्या करिता 25 रु मोजावे लागणार आहे प्रथम दोन पेज करिता हा दर आकरला जाईल. त्यापुढील प्रत्येक पेज ला 2रु अतिरिक्त शुल्क आकरले जाणार असल्याची माहीती मिळाली. शासनाच्या या भूमिकामुळे शेतकरी व इतरांना मोठा जबरदस्त फटका बसणार आहे.
खरेदी विक्रीची फेरफार वगळता वारस नोदी बोजा कमी नाव कमी एकुण आठ प्रकारचे फेरफार नोंदविण्यास आता शुल्क भरावे लागणार आहे. आता सर्व फेरफार आँनलाइन पद्धतीनेच नोंदी कराव्या लागणार असुन, या करिता सेतु केंद्र, महा-ई-सेवा केद्र, आपले सरकार केद्रद्वरे करावे लागणार आहे. सातबारा उतारा, फेरफार नोंदी उत्पन्नचा दाखला, शेतकऱ्यांना कर्ज शेतजमीन खरेदी विक्री करिता अवश्यक असतात. यामुळे खर्च वाढणार आहे. शासनाने हि दरवाढ रद्द करावी अशी शेतक-याची मागणी जोर धरीत आहे.