करियरनांदेड

विद्यार्थ्यांनो परिश्रमाने उज्जवल यश मिळविता येते –ओमकांत चिंचोलकर

लोहा। बदलत्या काळात प्रचंड स्पर्धा आहे या स्पर्धेत टिकायचे असेल तर मेहनत जिद्द असायला पाहिजे. वास्तवाची जाणीव आपणास असायला पाहिजे.विद्यार्थ्यांनो परिश्रमाने उज्जवल यश मिळविता येते . असे मार्गदर्शन लोहा पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी केले.

शिवछत्रपती विद्यालयात इयता दहावी वर्गाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला .कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक दामोदर वडजे होते यावेळी व्यासपीठावर एमपीएससी उत्तीर्ण झालेले आविनाश मोरे, प्रसिद्ध निवेदक बालाजी गवाले,क्रीडा शिक्षक दिलीप काहलेकर, आर आर पिठ्ठलवाड, हरिहर धुतमल उपस्थित होते.

पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी आपण दहावीला दोन वेळेस नापास झालो पण पुढे अभ्यासात नेहमीच अव्वल राहिलो आहे ते सांगताना त्यांनी तीन विषयात पदव्युत्तर असून कायदाची पदवी धारण केली पण हे करताना परिश्रम व जिद्दीच् बळावर एमपीएससी झालो .राज्यात तिसरा क्रमांक पटकविला हे सांगताना विद्यार्थ्यांना त्यांनी आजच्या तीव्र स्पर्धेची जाणीव असली पाहिजे .पुढील काळ कठीण आहे अपयश आले म्हणून खचून न जाता जोमाने त्यांच्यावर मात करण्याची तयारी ठेवा .समाजात वावरताना शिस्त व नियमांचे पालन करा.आई वडील गाव शाळा यांचा नावलौकिक करावा असे मार्गदर्शन करताना आपण सतत प्रफुल्लित उत्साहित असतो याचे रहस्य यांनी सांगितले .विद्यार्थ्यांनी हसत खेळत पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी मुख्याध्यापक दामोदर वडजे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या .एमपीएससी उत्तीर्ण झालेले अविनाश मोरे यांनी अनुभव सांगितले. वर्गशिक्षक बी एन गवाले, पिठ्ठलवाड आर आर यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. संचलन एस एच शेख यांनी तर आभार दिलीप काहलेकर यांनी केले. यावेळी व्ही एस गुद्धे, आर आर पारेकर , एस इ पवार, ,विकास ढगे, भुजबळ, श्रीमती आढावा, मीनाताई पवार, रामेश्वर जामगे यासह सर्व शिक्षक वृंद कर्मचारी उपस्थित होतो.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!