नांदेडमहाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श आजच्या तरुणांनी घ्यावा – डाॅ. अंकूश देवसरकर

हिमायतनगर, अनिल मादसवार| छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले. अतिशय प्रयास परिस्थितीवर मात करून स्वराज्याची घडी छत्रपती शिवाजी महाराजांनी बसवली. खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी करायची असेल तर सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन जयंती साजरी करावी. आणि शिवजयंतीच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांच्या कार्याचा आदर्श घेवून, जिवनात काम करावे. हिच खऱ्या अर्थानं शिवरायांची जयंती करणे महत्त्वपूर्ण ठरेल.  असे प्रतिपादन शिवश्री डाॅ.अंकूश देवसरकर यांनी  केले.  

हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरांच्या प्रांगणात दिनांक २२ गुरूवारी आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्या निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डाॅ. अंकुश देवसरकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत  होते.  यावेळी मंचावर हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर,  शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर,  डाॅ.  श्रीकांत पाटील,  योगीराज प्रभू महाराज, युवासेना जिल्हाप्रमुख कृष्णा पाटील आष्टीकर, डाॅ.  राजेंद्र वानखेडे, डाॅ. दिलीप माने, डाॅ. गणेश कदम, डाॅ. दिगंबर वानखेडे, भाजपच्या प्रदेश सरचिटणीस सौ. रजनी पाटील,  कविता झाडे, पुष्पा शिंदे, आशा शिंदे, आदींसह अनेक मान्यवरांची प्रामूख्यानं उपस्थिती होती.

याप्रसंगी पुढे बोलतांना डाॅ.  देवसरकर म्हणाले की,  आप आपसातील मतभेद विसरून सर्वानी एकजुटीने काम करावे. आजचा तरूण व्यसनाधीन कडे आकर्षिला होत आहे.  हे कुठेतरी थांबले पाहीजे, आपण समाजाचे काही देणे लागतो हा विचार डोळ्यासमोर ठेवून सर्वानी काम केले तर समाजात दुराचार निर्माण होणार नाही. आपण सर्वजन छत्रपती शिवरायांचे वारसदार असून एकजुटीने समाजातील वाईट चाली रीती नष्ट करण्यासाठी आपली बुद्धी झिजवावी. असे अवाहनहि त्यांनी जयन्ती सोहळ्यात उपस्थित झालेल्या युवकांना केले.
  

प्रथमतः शहरातील मुख्य कमानीजवळील छत्रपती शिवाजी महाराज चौक फलकाचे पूजन पुष्पहाराने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर कमानीपासून ते कार्यक्रम स्थळापर्यंत पायी यात्रा काढण्यात आली. जयंती सोहळ्याच्या मंचावर उपस्थित झाल्यानंतर सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीसाठी आणण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर उपस्थित आमदार माधवराव पाटील जवळगावकर, डाॅ.  श्रीकांत पाटील,  शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर, कृष्णा पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. 

त्यानंतर फटाक्याच्या अतिशबाजीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर शहरातील मुख्य रस्त्याने भव्य शुभ यात्रा काढण्यात आली. यात युवकांनी डोक्यावर फेटा बांधून हाती भगवा ध्वज, प्रभू श्रीराम, शिवाजी महाराज व अफजलखानाचा वध करतानाचे छायाचीत्र घेऊन डीजेच्या तालावर डान्स केला. मिरवणुकीचे ठिकठिकाणी जल्लोषात व साई कलेक्शनच्या वतीने पुष्पवृष्टी करून तर शहरातील महिला मंडळींनी घरासमोर रांगोळी काढून मिरवणुकीचे स्वागत केले. तर येथील वर्धमान मेन्स वेयरच्या वतीने मिरवणुकीत सामील झालेल्या युवकांना थंड माथा वितरित करून शिवरायांना अभिवादन करण्यात आले. यावेळी हजारोच्या संख्येने शिवप्रेमी युवकांनी मिरवणुकीत सहभाग घेऊन जय भवानी जय शिवाजी नामाचा जयघोष केला. जयंती सोहळा शोभा यात्रा यशस्वी करण्यासाठी गोविंद शिंदे, रामभाऊ सूर्यवंशी, मोहन ठाकरे, वामनराव पाटील, गजू हरडपकर, अरविंद वानखेडे, ज्ञानेश्वर लिंगमपल्ले, नागेश शिंदे, किरण माने आणि सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या पदाधिकारी व सर्व सदस्य आणि गावातील तरुण युवकांनी परिश्रम घेतले.

पुढील वर्षी होणारी शिवजयंती हिमायतनगर शहरात कायमस्वरूपी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीच्या होईल. यासाठी असलेल्या सर्व तरतुदी केल्या जातील असे आश्वासन आमदार मधाराव पाटील जवळगावकर यांनी शिवजयंतीच्या मंचावरून देऊन उपस्थित सर्वाना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. 

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
× How can I help you?