श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड आयोजित स्कुल कनेक्ट २०२४ ला विधार्थाचा ऊत्स्फुर्त प्रतिसाद
नांदेड l श्री गुरु गोबिंद सिंघजी इन्स्टिट्युट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, विष्णुपुरी, नांदेड तर्फे आयोजित स्कूल कनेक्ट (NEP कनेक्ट) – २०२४ व्यासपिठावर संस्थेचे संचालक डॉ.मनेश कोकरे, वक्ते महेश पाटील,शिवाजी कॉलेज कंधार चे प्राचार्य मा.डॉ.जोगदंड, अधिष्ठाता (शैक्षणिक) डॉ.ए.बी. गोंडे,अधिष्ठाता (संशोधन व विकास) डॉ.ए.व्हि. नांदेडकर,नियमक मंडळ सदस्य डॉ.डी.डी.डोये व डॉ.जे.व्हि.मेघा,प्र.रजिस्ट्रार डॉ.अरुण पाटील,विभाग प्रमुख डॉ.प्रकाश जाधव, विभाग प्रमुख डॉ. मिलिंद भालेराव, प्रवेश विभाग प्रमुख डॉ.एस.बी.मुंढे, जनरल सायन्स विभाग प्रमुख डॉ.किरण सानप इत्यादींची उपस्थिति होती. कार्यक्रमाची सुरुवात विभाग प्रमुख डॉ.मिलिंद भालेराव यांच्या प्रस्ताविकाने झाली. नियामक मंडळाचे सदस्य डॉ. डी.डी.डोये यांनि त्यांचे मनोगत व्यक्त केले. संस्थेचे संचालक डॉ. मनेश कोकरे यांनी संस्थेच्या उभारणी पासून आज पर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेतला.
त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत उपलब्ध असलेल्या विविध संधीं,संस्थेतील शैक्षणिक विभाग,प्लेसमेंट आणि रोजगाराच्या संधीं, विविध कंपन्यांची प्लेसमेंट प्रक्रिया या बद्धल सखोल माहिती दिली. “आपले कॉलेज उच्च दर्जाचे असून संशोधनासाठी मराठवाड्यातील अग्रगण्य आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.विद्यार्थ्यांना रोजगारक्षम तसेच उद्यमशील उद्योजक कसे बनता येईल याबद्दल मार्गदर्शन करून संस्था या बाबत प्रयत्न करणार आसल्याचे सांगितले.पुढील पाच वर्षांत कॉलेजला युनिटरी युनिव्हर्सिटी बनवण्याचा मानस बोलून दाखवला.
यानंतर, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शिवाजी कॉलेजचे प्राचार्य मा. डॉ. जोगदंड यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विषय कसे निवडता येतील या बद्दल श्रोत्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे मुख्य वक्ते मा. श्री.महेश पाटील यांनी आपल्या खुमासदार शैलीत विविध अभियांत्रिकी महाविद्यालात प्रवेश घेताना पालक व विद्यार्थी यांनी कोणती काळजी घ्यावी, फॉर्म भरताना चुका कश्या टाळाव्यात, त्यामुळे होणारे नुकसान याची माहिती दिली व अधिकृत प्रवेश प्रक्रिया केंद्रातूनच फॉर्म भरण्याचे अवाहन केले.
संस्थेतील प्रवेश विभाग प्रमुख डॉ.एस.बी.मुंडे यांनी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीचे महत्व स्पष्ट केले आणि अभियांत्रिकी शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेतील विविध टप्पे ज्यात ऑनलाईन प्रवेश अर्ज, लागणारी कागदपत्रे, अर्ज निश्चिती, गुणवत्ता यादीतील त्रुटी कशा दुरुस्त कराव्यात, विकल्प सादर करणे, कॅप जागावाटप आणि जागास्वीकृती याबद्दल सविस्तर माहिती दिली. संस्थेतर्फे संपूर्ण प्रवेश प्रक्रिया होईपर्यंत मोफत मार्गदर्शन केले जाईल व ऑनलाईन नोंदणी कॉलेजच्या CCF लॅबमध्ये करून दिली जाईल, असे सुद्धा सांगितले.
यानंतर कॉलेजचे अधिष्ठाता (शैक्षणिक) डॉ.ए.बी.गोंडे यांनी मुलांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० बद्दल सखोल मार्गदर्शन केले. या संस्थेमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून लागू करण्यात आले असून, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांना विविध शाखामधील उपलब्ध असलेल्या मायनर प्रोग्राम बद्धल माहिती दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आपल्या शंका मांडल्या आणि उपस्थित मान्यवरांनी त्या शंकांचे निरसन केले. उपस्थित विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.या कार्यक्रमाचा उद्धेश १२ वी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना अभियांत्रिकी प्रवेशासाठी मार्गदर्शन व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या बद्धल माहिती देणे हे होते, कार्यक्रमाच्या शेवटी रसायण अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ.प्रकाश जाधव यांनी सर्वांचे आभार मानले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली,हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संचालक डॉ.मनेश कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन समितीतील सर्व सदस्यानी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, पालक,पत्रकार,प्राध्यापक मोठ्या संख्येनि उपस्थित होते.