स्वच्छतेच्या बाबतीत सिद्धीपेठचे नाव देशाच्या नकाशावर झळकले
नांदेड। जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील काटकळंबा येथील भूमिपुत्र प्रशांत जीवनराव पाटील हे सध्या तेलंगणा राज्यातील सिद्धीपेठ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
सिद्धीपेठ शहराला स्वच्छतेबाबत केंद्र सरकारने दक्षिण भारतातील स्वच्छ शहर सर्वेक्षण मध्ये स्वच्छ शहर पुरस्कार २०२३ प्रथम क्रमांक म्हणून पुरस्कार दिला आहे. नांदेड जिल्ह्यातील भूमिपुत्राने तेलंगणा राज्यांमध्ये आपल्या कार्याने ठसा उमटवल्यामुळे नांदेडकरची मान अभिमानाने उंचावलेली आहे. यापूर्वी सुद्धा प्रशांत पाटील यांना विविध जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य केल्यामुळे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.
सिंगापूरच्या शहराच्या धर्तीवर सिद्धीपेठ शहरामध्ये स्वच्छतेच्या बाबतीत प्रशांत पाटील यांनी अतिशय योग्य नियोजन करत, वेगवेगळे उपक्रम हाती घेत, सर्वसामान्य नागरिक तसेच कर्मचारी, सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र करत हे स्वच्छतेचे कार्य हाती घेतले आणि स्वच्छ भारत मोहिमेमध्ये भाग घेतला. या उपक्रमाची दखल केंद्र सरकारने घेऊन सिद्धीपेठ शहराला दक्षिण विभागातून अग्रक्रम देऊन स्वच्छ शहर पुरस्कार २०२३ गौरव केला. प्रशांत पाटील यांचे संपूर्ण तेलंगणा राज्यामधून तसेच नांदेड जिल्हासह महाराष्ट्रातील त्यांच्या सर्व मित्र परिवार कडून त्यांचावर अभिनंदन वर्षाव होत आहे.