नवीन नांदेड। शालेय जीवनातील आनंद देणारी बाब म्हणजे शैक्षणिक सहल,सहलीला जाण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी आसूसलेला असतो.
सहल किती दिवसांची, कोठे जातेय यापेक्षा आपल्या सवंगड्यासह मोकळ्यात वातावरणात मौजमजा करायला मिळणार हा आनंद काही औरच असतो. जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी संचलित शिवाजी विद्यालय, सिडको नांदेड शाळेच्या इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी चाकुर येथे ४ जानेवारी उद्यान निसर्ग सहलीतून मिळणाऱ्या आनंदाला व्दिगुनीत करत धम्माल केली.
चाकूर येथे वृंदावन गार्डनमधील वॉटर पार्क, इंजिन बोटींग,मिनी ट्रेन,डॅशिंग कार,कॅमल गो राऊंड, जंगल स्वींग, झिप लाईन,वुडी स्वींग, ड्रॅगन कोस्टर, हॅप्पी नोरी, टॉवर सह वनभोजनाचा आनंद घेतला.या सहलीस इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसह शाळेचे मुख्याध्यापकप्रा.एस.एम. देवरे, पर्यवेक्षक व्ही.एस.पाटील, सौ.के.पी.पल्लेवाड, सौ.ए.जी. देगावकर, सौ. ए. के.जांबकर, सहलप्रमुख एस.के. आनकाडे , जी.ए.जाधव, एन.पीजाधव, आर.के. चंदनशिवे, डी.जी.पवार, एम.जी.स्वामी,सी.जी.पावडे आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.