senior citizens : पाच हजार गरिब गरजवंत ज्येष्ठ नागरिकांची लक्षवेधी पदयात्रा व आमरण अन्न पाणी त्याग अंदोलन
नांदेड (दक्षिणचे) सहृदयी मा.आ.आनंदराव तिडके पाटील बोंढारकर याच्या मध्यस्तीने संपन्न -डाॅ.हंसराज वैद्य

नांदेड| राष्ट्रीय शहिद दिनी रविवारी,सकाळी साडेदहा वाजता शहिद भगतसिंघ,शहिद शिवराम राजगुरू.शहिद सुखदेव थापर यांच्या प्रतिमेस डाॅ.हंसराज वैद्य अध्यक्ष यांच्या हस्ते पुष्प मालार्पण व पूजन करून हिरवि झंडी दाखवून प्रभाकर कुंटूरकर, गिरिष बार्हाळे,रामचंद्र कोटलवार डाॅ.लक्ष्मी पुरणशेट्टीवार, डाॅ.अंजली चौधरी, डाॅ.पुष्पा कोकीळ,दलित मित्र माधवराव पवार काटकळंबेकर, लातूर जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मा.आर.बी.जोशी साहेब यांच्या विशेष उपस्तीत तथा श्रीमती खान मॅडम आदिंच्या नेत्रूत्वा खाली जवळ जवळ पाच हजार गरिब गरजवंत ज्येष्ठ नागरिक महिला पुरूष्यांच्या व रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेल्या नांदेडकर जनतेच्या साक्षिने तथा निर्धाराने अत्यंत शिस्तीने तिघा तिघांच्या शृंखलेने “भव्य लक्षवेधी पदयात्रा” रस्त्याच्या डाव्या बाजूने निघाली.
पदयात्रेत ठरल्या प्रमाणे कसल्याच घोषणा दिल्या जात नव्हत्या..!
पदयात्रा नांदेड जिल्हा पोलिस अधिक्षक मा.अबिनाश कुमार यांच्या अधिपत्याखाली पोलिस तथा ट्रॅफिक पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास वळसा घालून,लाल बहादूर शास्रीजींचा पुतळा व महात्मा गांधीजिंच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालय समोर रस्त्यावर पोहंचली. पदयात्रा जिल्हाधिकार्यालया समोर भर उन्हात रस्त्यावर स्थिरावली! खाली अत्यंत तापलेला धरणीमाय,वर अकाशातून सूर्य नारायण अक्षरशः आग ओकत अस्ताना व पोटात भूकेची आग धगधगत असलेल्या अवस्थेत गरिब गरजवंत साठ-पासष्ट-सत्तर पंचाहत्तर ते ऐंशी पंचाऐंशीच्या वर पोंहचलेले गरिब गरजवंत,दुखी कष्टी, दुर्लक्षित, उपेक्षित,वंचित, लक्षणीय संख्येने विधवा माता तथा दिव्यांग असे जवळ जवळ पाच हजार ज्येष्ठ नागरिक हे दृश्य कसलेही पाषाण काळिज पिळवटून टाकणारे असेच होते.
रस्त्त्यावर भर तळपत्या उन्हात जेवढे,किंबहूना तेवढेच वृक्षाच्या छायेचा आश्रा घेतलेले ऐंशी पंच्याऐंशीच्या पुढची तथा आजारी ज्येष्ठ नागरिक असे हृदय भरून आणणारे विलक्षण दृश दिसून आले. यावेळी प्रभाकर कुंटूरकर,रामचंद्र कोटलवार, डाॅ.लक्ष्मी पुरण शेट्टीवार, डाॅ.अंजली चौधरी,मा. आर.बी. जोशी (लातूर ज्ये.ना.संघ जिल्हाध्यक्ष) आदिंनी ज्येष्ठांना यथोचित मार्ग दर्शन केले व ज्येष्ठ नागरिकांची दाद मिळविली. डाॅ.हंसराज वैद्य अध्यक्ष यांनी ज्येष्ठांच्या स्वातंत्र्य लढ्या पासून ते आज तागायत देशाला स्वातंत्र्य मिळवून देवून देशाला समृद्ध करण्यासाठी,भारतीय संस्कृती टिकविण्याच्या तथा जोपासण्याच्या अतिमहत्वाच्या कार्यात घेतलेला सहभाग, दिलेले योगदान तथा केलेल्या समर्पणाचा आढावा घेतला व ज्येष्ठ नागरिकच देशाचा अनमोल ठेवा,अनुभव संपन्नतेचा सागर,कुटूंबच नाही तर देशाचे आधारवड असून तेच राष्ट्राचे खरे “शिल्पकार” असल्याचे सांगीतले.राष्ट्राची खरी “राष्ट्रीय संपत्ती”म्हणून शासनाने घोषित करावे अशी मागणी केली.
शासनाने चालू अर्थ संकल्पीय अधिवेशनातच ज्येष्ठ नागरिकांचे प्रलंबित प्रश्न जसे ज्येष्ठ नागरिकांचे ज्येष्ठ नागरिकांचे सुधारित धोरण,2007चा पारित कायदा, 2010चे पारित नियम व 2013चा पारित कायदा, घटणेतील ज्येष्ठा बद्धलचा 41वा कलमाची तंतोतंत अंमलबजावनी,मुख्यमंत्री लाडके ज्येष्ठ माय बाप योजना,घरापरत्वे तथा कुटूंबा परत्वे एक ते चार जेष्ठ नागरिक अर्थात एकून मतदात्याच्या विस टक्के इतका मतदाता समूह हा ज्येष्ठ नागरिक समूह,त्यांचा सहभाग, योगदान,तथा समर्पण लक्षात घेऊन त्यांच्यातून एक महिला व एक पुरूष विधान परिषद तथा राज्यसभेवर पाठविण्याची तरतूद व त्यांना “राष्ट्रीय संपत्ती” म्हणून घोषित करावी.
फक्त गरिब गरजवंत, दुर्लक्षित,उपेक्षित, वंचित शेतकरी, शेत मजूर,कष्टकरी, कामगार, निराधार, विधवा माता,तथा दिव्यांग ज्येष्ठ नानगरिकांना आंप्रदेश, कर्णाटक व तेलंगानादि शेजारिल राज्या प्रमाणे किमान 5000/- प्र.म. मानधन,सकळ ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने सर्व मुलभूत सुखसोई, कुठल्याही ज्येष्ठ नागरिकां साठीच्या शासकीय योजने साठी फक्त ज्येष्ठ नागरिक कार्ड व आधार कार्डच प्रमाण मानावे, ज्येष्ठांना वृद्धाश्रम योजना म्हणजे “संचालका साठी ते कुरण तर ज्येष्ठांसाठींचे ते मरण” तथा “शाप” आहे. त्या ऐवजी त्यांना “मान धन” हेच “वरदान” आहे.मान धनामुळे कुटूंबातच त्यांचा मान वाढणार आहे. त्यांचं आयुष्यमान वाढणार आहे म्हणून “मानधनाचिच तरतूदकरा” आदि मागण्या शासनास केल्या.
उपस्थिताना ठणकाऊन विचारले की तुम्ही सर्वजन स्वेच्छेने आमरण अन्न पाणी त्याग आंदोलनास तयार आहात का? घरची परवाणगी घेतली आहे का? शासन निर्णयास किती दिवस लागतील याची शाश्वती नस्तानाही आपण सर्वजन आमरण अन्न पाणी त्याग करण्यास तयार आहात का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जमलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांतून “हो” असीच आल्या नंतर अंदोलनास सुरवात करण्यात आली!
आ.आनंदराव बोंढारकर हे ज्येष्ठ नागरिकां साठी देवदूत होऊन आले
तब्बल आडिच तिन घंटे अंदोलन कर्ते ज्येष्ठ नागरिक ऊन्हात अक्षररशः तळपत राहिले. नांदेड जिल्ह्यातील नऊ आमदार व तिन खासदारांमधून एकही पठ्ठ्या ज्येष्ठ नागरिकाकडे ढूंकूनही पाहाला आला नाही हे मोठ्या खेदाने इथे नमूद करावे लागत आहे. नव निर्वाचित दक्षिण नांदेडचे तरूण,तडफदार,सुहृदयी एकमेव आमदार अंदोलन स्थळी पोहचले. मोठ्या मनाने सर्व ज्येष्ठांनां राम राम ठोकून,मा.ना. देवेंद्रजी फडणवीसांची घेतलेली बैठक, त्यानी विधानसभेत ज्येष्ठ नागरिकांचा मांडलेला मानधनाचा लेखा जोखा, ज्येष्ठांच्या कथा आणि व्यथा सबंधी इतंभूत माहिती दिली.
आणि मी शासनाचा व आपला प्रतिनिधी म्हणून अभिवचण देतो की मी मानधनासह ज्येष्ठांचे सर्व प्रलंबित प्रश्न मुख्यमंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब व मा.ना. उपमुख्यमंत्री द्वयांच्या व मा.ना. संजयजी शिर्साट सामाजीक न्याय मंत्रालयाद्वारे सोडवून घेई पर्यंत स्वस्थ बसणार नाही आपण सर्व जन कृपया घरी जा.तेव्हा सर्वानु सामूहिक रित्या आमरण अन्न पाणी त्याग अंदोलन पुढे चालू न ठेवण्या निर्णय घेऊन शासनाची निवेदने निवासी जिल्हाधीकारी मा.महेशजी वडजकर साहेबांना सुपूर्द केले.सर्वांचे अभार मानण्यात आले.
