अयोध्येतील श्री रामलल्लाचे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे शिवणीत थेट प्रक्षेपण होणार
शिवणी। दि.२२ जानेवारी २०२४ रोजी आयोध्या मध्ये होत असलेल्या प्रभू श्रीरामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा निमित्त किनवट तालुक्यातील शिवणी येथील ग्रामवासीयांच्या वतीने येथील हनुमान मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे धूम धडाकेबाज आयोजन केले जाणार आहे.आयोध्यातील साजरा होणारा प्रभू श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे चाळीस कॅमेऱ्याने होणाऱ्या कार्यक्रम शिवणीत लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे.
या भव्य दिव्य सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी शिवणी अप्पारावपेठ परिसरातील हिंदू बांधवांनी या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विविध हिंदू संघटने व गावकऱ्यांच्या वतीने आणि हनुमान मंदिर संस्थानातर्फे केले आहे.
दि २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या येथील हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार असून या सोहळ्यानिमित्त शिवणी येथील व्यापारी आणि गावकऱ्यांच्या वतीने हनुमान मंदिररात २२ जानेवारी सोमवारी रोजी सकाळी सहा वाजल्यापासून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. तर सर्व प्रथम सकाळी सहा वाजाता वीर बाजरंगबली हनुमान वरती व श्री साईबाबा मूर्तीला अभिषेक करण्यात येणार आहे. ८ वाजाता नित्यआरती, ९ ते १० यावेळेत प्रभू श्रीरामाचे चित्र लावून गावात विविध ठिकाणच्या मंदिरापासून भव्य मिरवणूक काढण्यात येत आहे.
१० ते १२ वाजेपर्यंत ह.भ.प.भीमराव सूर्यवंशी महाराज फुटणाकर यांचे रामकथेवर प्रवचन होईल.दुपारी अभिजित मुहूर्तावर आयोध्येतून आरती दरम्यान येथे सामूहिक आरती केले जाईल व त्या नंतर हनुमान चालीसा पठण केले जाणार आहे.लहान बालक विद्यार्थ्यांचे राम गीतावर नृत्य सादर करण्यात येईल.दु २ वाजता महिलांचे हळदी-कुंकू चा कार्यक्रम होईल सायंकाळी ४ वाजेपासून महाप्रसादयाचा कार्यक्रम होईल,सायं ६ वा दीपोत्सव साजरा होणार असून ७ वा जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला जाणार आहे.
हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र यांचे आयोध्या येथील मंदिर पूर्ण व्हावे अशी देशातील समस्त हिंदू बांधवांची कित्येक वर्षापासूनची इच्छा होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे स्वप्न साकार केले असून प्रभू रामचंद्राचा आयोध्या येथील ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठापनाचा सोहळा याची देहा याची डोळा पाहण्यासाठी आयोध्या येथून थेट प्रक्षेपण होणार आहे.शिवणी येथील हनुमान मंदिरात सकाळी ११ ते १ या दरम्यान श्रीराम भक्तांना हा प्रक्षेपण सोहळा स्क्रीन एलईडी व थेट पाहता येणार असल्याने हनुमान मंदिर संस्थान शिवणी येथील आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
करीता शिवणी परिसरातील हिंदू बांधवांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी २२ जानेवारी २०२४ सोमवार रोजी हनुमान मंदिरात करण्यात आले आहे.या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे.तर दि २२ जानेवारी रोजी शिवणी बाजारपेठ व दुकाने पुर्णपणे बंद ठेवण्याचे सांगितले जात आहे.तर उद्या २१ जानेवारी रविवारी सायंकाळी स्वछता मोहीम राबवली जाणार असून व्यापारी, तरुणांई या स्वच्छता मोहिमेत सहभाग घ्यावा असे सांगण्यात आले आहे.