नवीन नांदेड। शिवसेना शिंदे गटाच्या सिडको शहरसंघटक पदी निष्ठावंत शिवसैनिक दशरथ कंधारे यांच्यी नियुक्ती जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोढांरकर यांनी केली असून या निवडीबद्दल कंधारे समर्थक यांनी अभिनंदन केले आहे.

सिडको हडको शहरात दशरथ कंधारे यांनी सामाजिक कार्य केले असून पक्ष संघटना व वेळोवेळी आंदोलने व विकास कामात अग्रेसर असून नांदेड तालुका संजय गांधी निराधार योजना सदस्य म्हणून कार्यरत असतांना अनेक निराधार महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले तर सिडको शहर विभाग प्रमुख म्हणून ही उल्लेखनीय कार्य केले आहे.

शिवसेना जिल्हा प्रमुख आनंदराव पाटील बोढांरकर यांनी केलेल्या उलेखनीय कार्याची दखल घेत सिडको शहर संघटक म्हणून नियुक्ती केली असून या नियुक्ती पत्रकात वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या आदेशानुसार, संपर्क प्रमुख आंनद पाटील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्ती करण्यात आली असून हे नियुक्ती पत्र देतांना नांदेड दक्षिण तालुका प्रमुख ऊध्दव पाटील शिंदे, सिडको शहर प्रमुख सुहास पाटील खराणे, ऊपशहर प्रमुख पप्पू गायकवाड यांच्या उपस्थितीत देण्यात आले, या निवडीबद्दल शिंदे शिवसेना गट पदाधिकारी व शिवसैनिक मित्र मंडळ यांनी दशरथ कंधारे यांच्ये अभिनंदन केले आहे.

