धर्म-अध्यात्मनांदेड

नृसिंह नरोबा मंदिर कौठा येथे शिव पुराण कथा व नृसिंह जन्मोत्सव सप्ताह आयोजन

नवीन नांदेड। श्री नृसिंह नरोबा मंदीर बसवेश्वर नगर जुना कौठा नांदेड येथे अखंड हरिनाम सप्ताह शिवपुराण कथा व श्री नृसिंह जन्मोत्सव सोहळा कार्यक्रम निमित्त १५ ते २२ मे पर्यतं विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून शिव पुराण कथा प्रवक्ता हभप बालाजी महाराज गुडेवार यांच्या सूमधुर वाणीतून दररोज दुपारी १ ते ४ दरम्यान आयोजित करण्यात आला.

नृसिंह जन्मोत्सव निमित्ताने महाअभिषेक व श्री मिरवणूक, आरती व जन्मोत्सव महाआरती आयोजित करण्यात आली असून जिल्हा परिषद बळीरामपुर सर्कल नांदेड चे गंगाप्रसाद काकडे यांच्या वतीने २२ मे रोजी दुपारी १२ वाजता महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षी प्रमाणे याही १४व्या वर्षी १५ ते २२ मे दरम्यान शिवपुराण कथा दररोज दुपारी १ ते ४ दरम्यान व श्री नृसिंह जन्मोत्सव निमित्ताने सप्ताहातील दैनिक कार्यक्रम काकडा पहाटे ५ ते ६,अभिषेक सकाळी ६ ते ७ ज्ञानेश्वर पारायण सकाळी ७ ते १०,गाथा भजन सकाळी १० ते १२ ,शिवमहापुराण कथा दुपारी १ ते ४ ,हरिपाठ सायं. ५ ते ७ होणार आहे.

दररोज रात्री ८ ते १० हारी किर्तनकार आयोजित करण्यात आले असून दि.१५ ह.भ.प.श्री माधव महाराज येलूरकर,१६ रोजी ह.भ.प.श्री परमेश्वर महाराज शहापूर, १७ रोजी ह.भ.प.श्री गंगाधर महाराज वसूरकर दि.१८ ह.भ.प.सौ.मैनाताई हिंपळनारीकर, दि.१९ ह.भ.प.श्री तुकाराम महाराज मंडगीकर, दि.२० ह.भ.प.श्रीदता महाराज महाराज वळसंगवाडी दि.२१ रोजी ह.भ.प.श्री बालाजी महाराज गुडेवार यांच्ये किर्तन आयोजित करण्यात आले आहे.

नृसिंह जन्मोत्सव निमित्ताने २१ मे रोजी सकाळी महा अभिषेक, महाआरती श्री मिरवणूक,आदी कार्यक्रम तर २२ मे रोजी दुपारी १२ वाजता मंदिर अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य बळीरामपुर गंगाप्रसाद काकडे यांच्या वतीने महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहयात भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मंदिर विश्वस्त समिती व पुजारी व्यंकटेश गुरू यांनी केले आहे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!