उस्माननगर। नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे विश्वासू कार्यकर्ते असणारे बुद्धाजी ( बाबुराव ) पाटील घोरबांड यांच्या पत्नी ,सामाजिक कार्यकर्त्या तथा माजी ग्रामपंचायत सदस्या सौ.इंदुबाई बुध्दाजी घोरबांड यांची भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या कंधार तालुका ग्रामीण सदस्य पदी नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
उस्माननगर येथील बाबुराव पाटील घोरबांड हे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे विश्वासू सहकारी, कार्यकर्ते म्हणून अनेक वर्षापासून एक निष्ठ होऊन साहेबा सोबत राहून पक्षाचे काम करत असतात.खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या बैठकीला उपस्थित राहतात.उस्माननगर परिसरात प्रत्येक निवडणुकीत त्यांचा सहभाग असतो. निवडणूकीत त्यांनी टाकलेला शब्द महत्त्वाचे मानले जाते.मागील निवडणुकीत बाबुराव पाटील घोरबांड यांनी खा.चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा सहकारी सोसायटी निवडणूक व ग्रामपंचायत निवडणुकीत पत्नीला उमेदवारी देवून निवडून आले होते.तळगळातील गोरगरिबांना शासनस्तरावरील योजनेचा लाभ देखील मिळवून दिला आहे.
सौ.इंदुंबाई बाबुराव पाटील घोरबांड या भाजपाच्या विचारधारा , सेवाभाव ,समर्पण, मेहनत,व संघटन कौशल्याव्दारे कार्य सामान्य महिला पर्यत तळागाळापर्यंत पोहचावे, भारतीय जनता पार्टी महिला संघटनात्मक कार्य अधिक भक्कम व मजबूत करण्य करीत महिला मोर्चाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण्याची जबाबदारी ॲड.डाॅ. जयमंगला भवानीशंकर औरादकर ( मंडळ अध्यक्ष , भा.ज .पा. महिला मोर्चा , ग्रामीण कंधार ) यांनी नियुक्ती पत्र देऊन त्यांच्यावर सोपवली आहे.
सौ.इंदुंबाई बाबुराव पाटील घोरबांड यांची निवड झाल्याबद्दल सरपंच सौ. शोभाबाई शेषेराव काळम, गावातील ज्येष्ठ भाजपा राष्ट्रीय सदस्य तुकाराम वारकड गुरूजी , सुरेश मामा बास्टे , साईनाथ पाटील कपाळे, वैजनाथ पाटील घोरबांड , माधवराव भिसे ,शिवशंकर काळे , ( भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष) संजय वारकड , शेषेराव काळम, कचरू घोरबांड , बालाजी काळम,बि.पी.घोरबांड , यांच्या सह अनेकांनी अभिनंदन केले आहे.