गंगाखेड तालु्क्यात वीज पडून तिघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी
परभणी। परभणीत वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाट होऊन जोरदार पाऊस झाला. दरम्यान याच वेळी परभणीच्या गंगाखेड तालुक्यात पावसाने हजेरी लावली होती. या मुसळधार पावस सुरु असतांना सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास वीज पडून तिघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले असल्याची घटना समोर आली आहे.
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालु्क्यातील मौजे भेंडेवाडी व डोंगरपिंपळा गावात हि दुर्दैवी घटना घडली आहे. भेंडेवाडी व डोंगरपिंपळा या दोन्ही गावात वीज पडल्यामुळे तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिघेजण गंभीररित्या जखमी झाले आहेत.
परभणीच्या भेंडेवाडी व डोंगरपिंपळा या भागात सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. डोंगरपिंपळा या भागात पाऊस सुरू असताना सविता विठ्ठल कतारे वय ४० वर्ष, निकिता विठ्ठल कतारे वय १८ वर्ष या मायलेकींच्या अंगावर वीज कोसळली. या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
तर गंगाखेड तालुक्यातील भेंडेवाडी येथे सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान वीज कोसळण्याची घटना घडली. या घटनेत ओंकार किशन घुगे वय १४ वर्ष याचा जागीच मृत्यू झाला. तसेच गोविंद विनायक घुगे वय ३० वर्ष, सुनिता काशिनाथ शेप वय ४८ वर्ष , रेणुका काशिनाथ शेप वय २७ वर्ष हे गंभीर जखमी झाले आहेत. सदरील घटनेमुळे गंगाखेड तालुक्यावर शोककळा पसरली असून, सर्वस्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.