श्री गुरु गोबिंद सिंघजी इन्स्टिट्युट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी तर्फे १२ वी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थी, पालकांसाठी स्कूल कनेक्ट कार्यक्रमाचे आयोजन
नवीन नांदेडl श्री.गुरु गोबिंद सिंघजी इन्स्टिट्युट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी, विष्णुपुरी, नांदेड तर्फे १२ वी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी स्कूल कनेक्ट (NEP कनेक्ट)-२०२४ कार्यक्रमाचे आयोजन बुधवार, दिनांक २६ जुन २४ रोजी सकाळी ११ वाजता,कुसुम सभागृह, व्ही.आय.पी.रोड,नांदेड येथे करण्यात आले आहे. या आयोजित कार्यक्रमाला नांदेड जिल्हाधिकारी, भिजित राऊत,उमेश नागदेवे, मा. सह-संचालक,उच्च व तंत्र शिक्षण,विभागीय कार्यालय छत्रपत्ती संभाजीनगर, डॉ.मनेश कोकरे,संचालक, श्री गुरु गोबिंद सिंघजी इन्स्टिट्युट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी,विष्णुपुरी, नांदेड इत्यादी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमा अंतर्गत १२ वी विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांना पुढील शिक्षणाच्या प्रवेशा साठी मार्गदर्शन करणे हे या एक दिवसीय मार्गदर्शन कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट्य आहे. अभियांत्रिकी शिक्षणातील विविध संधीची कल्पना आणि वेगाने होत असलेल्या बदलांचा विद्यार्थ्यांना फायदा होऊन त्यांचे भविष्य कसे उज्वल होईल या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमामध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या अभ्यासक्रमा मध्ये असलेल्या विविध संधीबद्दलची माहिती विद्यार्थी आणि पालकांना देण्यात येणार आहे.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेत स्थळावरील सविस्तर माहिती तसेच तंत्रशिक्षण संचालनाल याच्या अधिनस्त असलेले विविध पदवी अभ्यासक्रम, त्यांना
प्रवेश घेतांना लागणारी पात्रता,प्रवेश नीयमावली,
ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया, अर्ज भरण्याची प्रक्रिया, प्रक्रियेचा साधारण कालावधी,त्यासाठी लागणारी कागदपत्रे इत्यादीची माहिती देण्यात येणार आहे.याला अनुसरून प्रवेश अर्ज भरल्यानंतर अर्ज निश्चिती करणे,गुणवत्ता यादी मधील त्रुटी दुरुस्त करणे, अंतिम गुणवत्ता यादी तपासणे,विकल्प सादर करणे, कॅप जागावाटप, जागास्वीकृती करणे, जागावाटप केलेल्या संस्थेत प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेणे इत्यादी पदवी प्रवेश प्रक्रियेशी संबंधीत बाबींची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येईल.
यासोबतच शासनामार्फत देण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्त्या विषयी माहिती देऊन अभियांत्रिकी शिक्षण कमी खर्चात पूर्ण करून रोजगारक्षम तसेच उद्यमशील उद्योजक कसे बनता येईल आणि placement संबंधी विस्तृत माहिती विद्यार्थी व पालकांना देण्यात येईल.अभियांत्रिकी प्रवेश इच्छुक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये योग्य अभ्यास क्रमाची निवड, उपलब्ध रोजगार व नविन उद्योग सुरु करण्याच्या संधी,विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, या विषयी जागरूकता निर्माण करणे हा स्कूल कनेक्ट कार्यक्रमाचा उद्देश आहे.
हा कार्यक्रम पूर्णतः निशुल्क असुन या संस्थेच्या व प्रशासकीय मंडळाच्या वतीने,सर्व संबंधीत विद्यार्थी, पालक, महाविद्यालया तील ईच्छुक प्राध्यापक वर्ग यांनी दिनांक २६.जुन २४ रोजी सकाळी ११ वाजता, कुसुमसभागृह, व्ही.आय.पी.रोड,नांदेड येथे कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे अवाहन करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी संस्थेची वेब साईट www.sggs.ac.in ला भेट द्या व कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी करावे https://tinyurl.com/sggsiet140624 ह्या लिंक वर जाऊन google form भरून नाव नोंदणी करावे.