नांदेड/भोकर। सेवा समर्पण परिवार च्या वतीने देण्यात येणा-या राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला असून सकाळ समूहाचे संपादक संदीप काळे यांना राज्यस्तरीय पत्रकारिता सेवा समर्पण पुरस्कार तर डॉ अभिजित सोनवणे यांना राज्यस्तरीय समाजसेवा सेवा समर्पण पुरस्काराची घोषणा सेवा समर्पण परिवार चे अध्यक्ष राजेश्वर रेड्डी लोकावाड, सचिव विठ्ठल फुलारी यांनी केली.
सेवा समर्पण परिवार च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त मागील दोन वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जोपसणाऱ्यांना पुरस्कार दिला जातो. यावर्षी सकाळ समूहाचे संपादक तथा व्हाइस ऑफ मीडिया चे संस्थापक संदीप काळे यांना राज्यस्तरीय पत्रकारिता सेवा समर्पण पुरस्कार तर सामाजिक काम करणारे डॉ अभिजित सोनवणे यांना राज्यस्तरीय समाजसेवा सेवा समर्पण पुरस्कार देण्यात येणार आहे. आहे. या पुरस्काराचे स्वरूप रोख ११ हजार, मानपत्र, सन्मानचिन्ह असे राहणार आहे.
पुरस्कार वितरण सोहळा दि.३१ मार्चला सकाळी ११:३० वा. माऊली मंगल कार्यालय येथे जेष्ठ साहित्यिक दत्ता भगत, उपमुख्यमंत्री कार्यालयातील अव्वर सचिव राजेंद्र खंदारे, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ खंडेराव धरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
दि. ३० मार्च ला माऊली मंगल कार्यालय येथे रक्तदान शिबीर होणार असून या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार सुरेश घोळवे हे करणार असून प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ पंजाब चव्हाण, प्राचार्य संजय देशमुख, मुख्याधिकारी मारोती जगताप यांची उपस्थिती राहणार आहे. दि. २९ मार्च ला नागापूर ता भोकर येथे नेत्ररोग शिबिर आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सेवा समर्पण परिवार च्या वतीने करण्यात आला आहे.