नांदेड। मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी जागवण्यासाठी व हल्ल्यातील शहीदांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी यावर्षी देखिल पत्रकार विजय जोशी यांची निर्मिती असलेला सैनिक हो तुमच्यासाठी…. या देशभक्तीपर गिताचा कार्यक्रम दि. २६ नोव्हेंबर २०२३ रोजी डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावर्षी महाराष्ट्रातील दिग्गज कलावंत यात देशभक्तीपर गितांच्या रचना सादर करणार आहेत.
संवाद बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था आणि नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यावर्षीचा हा ५६ वा प्रयोग आहे.
गेल्या पंधरा वर्षापासून हा कार्यक्रम सातत्याने घेतला जात असून दरवर्षी नव्या कलावंताना संधी देतांनाच कार्यक्रमाची आखणी वेगवेगळ्या शैलीत केली जाते.
गेल्या पंधरा वर्षापासून हा कार्यक्रम सातत्याने घेतला जात असून दरवर्षी नव्या कलावंताना संधी देतांनाच कार्यक्रमाची आखणी वेगवेगळ्या शैलीत केली जाते.
कार्यक्रमाच्या आखणीबाबत संवाद प्रतिष्ठाणने योग्य नियोजन केले असून यावर्षी मराठवाड्यातील सुप्रसिध्द कलावंत इटीव्ही गौरव महाराष्ट्राचा व झी युवा संगीत संग्राम महाविजेता सुर नवा ध्यास नवा उपविजेता आणि मराठी चित्रपट डार्लींग आणि बॉईज-३ चा पार्श्वगायक रविंद्र खोमणे, सुर नवा ध्यास नवाचा पार्श्वगायक मुनव्वर अली (मुंबई), इंडियन आयडॉल मराठी फेम सुरभी गौड (मुंबई), लक्ष्मी खंडारे (मुंबई) सारेगम फेम, मानसी कुलकर्णी-देशपांडे (पुणे), वर्धिनी जोशी-हयातनगरकर (पुणे) या दिग्गज गायकांना यात समावेश आहे. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन सादसुरांची झी मराठी उत्सव नात्यांचा फेम वाद्यवृंद नाशिकचे अमोल पालेकर यांनी केले असून, ढालकीवर नाशिकचे गंगा हिरेमठ, अॅक्टोपॅडवर सुशिल केदारे (मुंबई), की बोर्डवर जयेश भालेराव (मुंबई) यांची संगीसाथ असणार आहे. कार्यक्रमाचे निवेदन छत्रपती संभाजीनगर येथील आर.जे.अभय हे करणार आहेत.
देशभक्तीपर गितांचा हा कार्यक्रम नांदेडच्या रसिक प्रेमींसाठी आणि देशभक्तांसाठी एक आगळीवेगळे पर्वणी असणार आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडूरंग बोरगावकर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त अबिनाशकुमार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
देशभक्तीची भावना जागृत करणार्या या भावपुर्ण कार्यक्रमाला सर्व देशभक्तांनी, युवकांनी, नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, या कार्यक्रमासाठी प्रवेश निःशुल्क असुन कार्यक्रम वेळेवर सुरू होणार असल्याचे संवाद बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था व नांदेड जिल्हा पोलीस दलाने कळविले आहे.