नांदेडलाईफस्टाईल
लिंबगाव ते नाळेश्वर मार्गावरील वाहतूकीस प्रतिबंध; पर्याय मार्गाचा वापर करण्याबाबत अधिसूचना निर्गमीत
नांदेड| लिंबगाव ते नाळेश्वर या रस्त्याचे मजबुतीकरणाचे काम करावयाचे असल्यामुळे या मार्गावरुन जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीस प्रतिबंध केला आहे. प्रतिबंध करण्यात आलेल्या मार्गाऐवजी पर्यायी मार्गाचा वापर करण्याबाबत जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी अधिसूचना निर्गमीत केली आहे.
लिंबगाव ते नाळेश्वर रस्ता प्रजिमा 22 या प्रतिबंध करण्यात आलेल्या मार्गाऐवजी वाहने नाळेश्वर-वाघी-सायाळ रस्ता (प्रजिमा-25) या पर्यायी मार्गाने ये-जा करतील. मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 मधील तरतुदीनुसार जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी संबंधित विभागाने उपाययोजना करुन 1 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2023 पर्यत नमूद केलेल्या नाळेश्वर-वाघी-सायाळ रस्ता (प्रजिमा-25) या पर्यायी मार्गाने सर्व प्रकारची वाहने वळविण्यास मान्यता दिली आहे.