नांदेड। उच्च विद्याविभूषित ‘निष्ठावंत’ शिवसैनिक प्रा. डॉ. राम नारायणराव चव्हाण यांची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेना नांदेड शहर उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या नियुक्तीचे आदेश दिले आहेत.
प्रा. डॉ.राम चव्हाण यांनी सुमारे ९० च्या दशकापासून शिवसेनेत सामान्य ‘शिवसैनिक’ म्हणून काम केले. यापूर्वी नांदेड उत्तर विभाग प्रमुख पदाची धुराही त्यांनी समर्थपणे सांभाळली. प्रा. डॉ. राम चव्हाण यांनी राज्यातील शिवसेनेच्या बंडाळी नंतरही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वैचारिक वारसा चालविणारे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील ‘निष्ठा’ कायम ठेवली.
प्रा. डॉ. राम चव्हाण यांचे संघटनात्मक कार्य तसेच नाट्यशास्त्रात पीएच.डी. प्राप्त उच्च विद्याविभूषित, अभ्यासू, चिंतनशील आणि कलासक्त कौशल्यांची नोंद घेऊन त्यांची नांदेड शहर उपजिल्हाप्रमुख पदी वर्णी लावली आहे. प्रा. डॉ. राम चव्हाण यांनी आपण आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना पक्षाच्या बळकटीसाठी कठोर परिश्रम घेणार असल्याचे सांगून या नियुक्ती बद्दल पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवा सेना पक्षप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत, विनायक राऊत, नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात, माजी खा. सुभाष वानखेडे, जिल्हाप्रमुख माधव पावडे, बंडू (प्रमोद) खेडकर, बबन बारसे, माजी आ. नागेश पाटील आष्टीकर, भुजंग पाटील, दत्ता कोकाटे आदींचे आभार मानले आहेत.