प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2024 चे उदघाटन
नवीन नांदेड| प्रादेशिक परिवहन कार्यालय परिसरात रस्ता सुरक्षा अभियान 15 जानेवारी 2024 ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. सदर अभियानाचे उद्घाटन दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेड सकाळी करण्यात आले ,यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी हेल्मेट वापरा जीव वाचवा व आपली व आपल्या परिवाराची काळजी घेण्याचे सांगितले
यावर्षी रस्ता सुरक्षा अभियान 2024 हे दिनांक 15 जानेवारी 2024 ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणार असून अभियानाचे उद्घाटन दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेड सकाळी 12.00 वाजता करण्यात आले. अध्यक्षस्थानी अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार हे होते. सदर कार्यक्रमामध्ये प्रादेशिक परिवहन अधिकारी,शैलेश कामत, नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्रीमती दलजित कौर जज,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.संजय पेरके, जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती ज्योती बगाटे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, सहा. प्रादेशिक परिवहक अधिकारी संदिप निमसे, वाहतूक निरिक्षक पोलिस निरिक्षक . मारकड, गुटे, ग्रामीण पोलीस स्टेशन नांदेडचे पोलीस निरिक्षक आयलाने सहायक पोलीस निरिक्षक श्रीधर जगताप, जिल्हा परिषद नांदेडचे शिक्षणाधिकारी (प्रा) प्रतिनिधी रोहिदास बस्वदे, शिक्षणाधिकारी (मा) प्रतिनिधी के.व्ही. पाठक, नांदेड वाघाळा महानगर पालिकाचे शहर अभियंता ,दिलीप आरसुडे,अभियंताअरुण शिंदे हे उपस्थित होते.
रस्ता सुरक्षा अभियान 2024 च्या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रस्ताविक शैलेश कामत यांनी देशातील, राज्यातील व जिल्हयातील अपघाताची माहिती दिली व अपघातामुळे होणारे परिणामाची माहिती दिली व नांदेड जिल्हयामध्ये यावर्षी हेल्मेटयुक्त अपघातमुक्त गांव अभियान राबविण्यात येणार असल्याचे कार्यक्रमाच्या वेळी माहिती दिली. व सदर अभियान हे जिल्हयात पूर्ण महिनाभर राबविण्यात येणार असून यामध्ये विविध उपक्रम व तपासणी मोहिम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले,यावेळी एनएसएस, एनसीसी व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विदयार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता फकीरा बहुउध्देशिय सेवा भावी संस्थेचे पथक यांनी जनजागृतीचा कार्यक्रम सादरीकरण करण्यात आला यावेळी. कार्यालयातील मोटार वाहन निरिक्षक, सहायक मोटार वाहन निरिक्षक व लिपीक कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मोटार वाहन निरिक्षक श्रीमती रेणुका राठोड यांनी केलेले आहे.