धर्म-अध्यात्मनांदेड

चंद्रपुर येथे श्री राम मंदिर अक्षता वाटपाची शोभायात्रा

किनवट। तालुक्यातील चंद्रपुर येथे श्री राम मुर्ती स्थापना मंदिर उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्ताने गावातुन वाजत गाजत शोभायात्रा काढुन अक्षता वाटपाचा कार्यक्रम पार पडला.

हिंदु धर्माचे श्रध्दास्थान असलेल्या अयोध्येतील प्रभु श्रीरामाच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठापणा मंदिर उद्घाटनाची प्रतिक्षा आता संपत आली आहे, या पार्श्वभुमीवर अयोध्येतुन आलेल्या अक्षता घरा घरा पर्यंत पोहचवण्यासाठी रामभक्त एकवटले आहेत, अतिशय उत्साहपुर्ण वातावरणात प्रभु श्री रामाच्या तैलचित्रासह शोभायात्रा काढण्यात आली होती.

ह्या शोभायात्रेची सुरवात श्री.गुरूसाहेब(गुरुद्वारा) येथुन करुन सम्पूर्ण गावात प्रदक्षिणा घालुन शेवटी गावातील हनुमान मंदीर येथे या शोभायात्रेची सांगता करण्यात आली. यात महिला भगिनींनी डोक्यावर कलश घेवुन मिरवणुकीत सहभाग घेतला होता. अबाल वृध्दांच्या घोषणांनी गाव भक्तीमय झाले होते. यावेळी दिग्रस चंद्रपूर ग्रामपंचायत येथील उपसरपंच कर्तार साबळे, गुरु साहेब, पोलीस पाटील जगणसिंग साबळे, ओमकार, अंकुश साबळे, संतोस ब्रधावल, सुभास, समस्त गावकरी उपस्थित होते.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!