
उस्माननगर, माणिक भिसे| जिल्हा परिषद प्रा.शाळा नवखरवाडी ता.कंधार येथील शाळेतील मुख्याध्यापक श्री शिवाजी कपाळे यांचे वडील कै. शिवराम पाटील कपाळे यांच्या पुण्यतिथी निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करून वडीलांना अभिवादन करण्यात आले.
नवखरवाडी येथील शाळेचे मुख्याध्यापक श्री शिवाजी कपाळे यांच्या वडिलांच्या पुण्यतिथी निमित्त शाळेतल्या मुलांना (गणवेश )ड्रेस वाटप केले .या कार्यक्रमाचे अध्यक्ष उस्माननगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शिवप्रकाश मुळे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नवघरवाडीचे सरपंच महेश कारामुंगे, गोळेगावचे सरपंच परमेश्वर पाटील कपाळे पानभोशी केंद्राचे मुख्याध्यापक पेटकर मॅडम, सौ अनिता दाणे, मन्मथराव किडे सर, केंद्रप्रमुख उद्धव सूर्यवंशी, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक जे एस काळे, केंद्रप्रमुख माधव कांबळे, श्री गायकवाड सर श्री कदम सर व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्री मुळे यांच्या शुभहस्ते शाळेतील मुलांना गणवेश (ड्रेस) आणि पायमोजे वाटप करण्यात आले.
मुख्याध्यापक शिवाजी कपाळे यांनी आपल्या वडिलांच्या पुण्यतिथी निमित्त विद्यार्थ्याना गणवेश स्वखर्चातून खरेदी करून शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. कपाळे यांनी अनाठायी खर्चावर नियंत्रण ठेवून आपल्या वडिलांच्या पुण्यतिथी दिनी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करून वडीलांना अभिवादन केले.यावेळी उस्माननगर पोलिस स्टेशनचे सपोनि श्री शिवप्रकाश मुळे यांनी पर्यावरण,व सामाजिक बांधिलकी या विषयावर गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की प्रत्येक नागरिकांनी वृक्षांची लागवड करून त्याची जोपासना करावी.पर्यावरणामुळे मोकळा श्वास घेता येते.असे मत व्यक्त केले.
