पंतप्रधानांचा 19 जानेवारी रोजी महाराष्ट्र दौरा
नवी दिल्ली| महाराष्ट्रातील सुमारे 2,000 कोटी रुपयांच्या 8 अमृत (कायाकल्प आणि शहरी परिवर्तनासाठी अटल मिशन) प्रकल्पांची पायाभरणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान सोलापूर शहरातील अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील .
पंतप्रधान महाराष्ट्रात प्रधानमंत्री आवास योजना-शहरी अंतर्गत पूर्ण झालेल्या 90,000 हून अधिक घरांचे लोकार्पण करतील. यासोबत, ते सोलापूरमधील रायनगर गृहनिर्माण संस्थेच्या 15,000 घरांचे लोकार्पण करणार आहेत, या लोकार्पण कार्याक्रमात लाभार्थी असलेले हजारो हातमाग कामगार, विक्रेते, यंत्रमाग कामगार, कचरा वेचणारे, विडी कामगार, चालक आदिंचा समावेश आहे. याशिवाय, पंतप्रधान कार्यक्रमा दरम्यान महाराष्ट्रातील पीएम -स्वनिधी च्या 10,000 लाभार्थ्यांना पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्यांचे वितरण सुरू करतील.
या कार्याक्रमानंतर श्री.मोदी दुपारी 2:45 च्या सुमारास, पंतप्रधान कर्नाटकातील बेंगळुरू येथे बोइंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्राचे उद्घाटन करतील आणि बोईंग सुकन्या कार्यक्रमाचा ही शुभारंभ करतील. त्यानंतर, संध्याकाळी 6 वाजता, पंतप्रधान श्री मोदी तामिळनाडूमधील चेन्नई येथे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2023 च्या उद्घाटन समारंभात सहभागी होतील.