भोकर। डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठाण, नांदेड तर्फे दिले जाणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय समता गौरव पुरस्कार पी पी हनवते यांना जाहीर करण्यात आले असून निवड समितीचे प्रमुख डॉ. पुंडलिक नामवाड, डॉ. मनोज राऊत, सुशीलकुमार भवरे यांनी माहिती दिली आहे.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठाण, नांदेड द्वारा एकदिवसीय बौद्ध धम्म परिषद सोनारी फाटा ता.हिमायतनगर जि. नांदेड येथे आयोजित करण्यात येते गेल्या सहा वर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठाणतर्फे हा पुरस्कार दिला जातो पुरस्काराचे हे सातवे वर्षे असून एकदिवशीय बौद्ध धम्म परिषदेस हा पुरस्कार सोनारी फाटा ता.हिमायतनगर जि.नांदेड येथे मान्यवरांच्या उपस्थितीत दिला जाणार आहे यावर्षी दि. १७ फेब्रुवारी २०२४ रोजी धम्म परिषद होणार असून या बौद्ध धम्म परिषदेमध्ये पी पी हनवते यांना राज्यस्तरीय डॉ बाबासाहेब आंबेडकर समता गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
त्यामधील पुरस्कार प्राप्त पी.पी.हनवते हिमायतनगरकर यांना धम्म परिषदेचे उद्घाटक शिवश्री कामाजी पवार, राष्ट्रीय अध्यक्ष मराठा सेवा संघ, परिषद अध्यक्ष आ.माधवराव पाटील जवळगावकर, स्वागताध्यक्ष प्रा.मोहन मोरे, रफिकभाई सेठ, निमंत्रक कैलासभाऊ माने, जोगेंद्र नरवाडे कामारीकर, मार्गदर्शक डॉ. प्रमोद अंबाळकर, आदी मान्यवरांच्या उपस्थीत सदरील पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे पी पी हनवते यांना राज्यस्तरीय डॉ बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय समता गौरव पुरस्कार जाहीर झाले त्यांना निवड पत्र डॉ मनोज गिमेकर , मनोज शिंदे , डॉ कैलास कानिंदे , पत्रकार जयभीम पाटील आदिनी त्यांना निवडीचे पत्र दिले हनवते यांचे तालुक्यात अनेकांनी अभिनंदन करून कौतुक करित आहेत.