नांदेडसोशल वर्क

आपघाताची शक्यता.. हदगाव शहराच्या मुख्यरोडवर वाहनांची गर्दी…

हदगाव, शे.चांदपाशा| हदगाव शहराच्या मुख्यप्रवेश रोडवर मोठ्या प्रमाणात शहरात कामानिमित आलेल्या नागरिकांची तहसिल कार्यालय, स्टेट बँक व पोलिस स्टेशन समोर टुव्हिलर आटो व चारचाकी ट्रक्टर, ट्रक ही वाहने रोडवर उभी केल्या जात असल्याने नागरिकांना मोठी अडचण निर्माण होत आहे.

यामुळे आपघात होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तहसिल परिसरात या मुख्यरोडवरुन शाळकरी व महाविद्यालयाचे विद्यार्थी याच रोडवरुन सकाळी दुपारी व संध्याकाळी ५ वाजेच्या दरम्यान येणे जाणे पैदल व सायकल ने करित असतात. मुख्यरोडवरच बहुसंख्य शाळा महाविद्यालये शासकीय कार्यालय आहेत. यातच या आर्ध्यारोडवर वाहने उभी राहत असल्याने येण्या -जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. यामुळे मोठा गंभीर अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली असतांना माञ याकडे पोलिसांचे साफ दुर्लक्ष होते आहे. या परिसरात न.पा. ने पार्कीगची व्यवस्था करून रस्त्यावरील अडथळा दूर करावा अशी मागणी जोर धरु लागलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!