नायगाव, रामप्रसाद चन्नावार। नायगाव तालुक्यातील धुप्पा येथे नायगाव विधानसभेचे आमदार राजेश संभाजी पवार यांच्या निधीतून समाज मंदिरासाठी निधी दिला असता,धुपा येथील नागरिकांनी आमदार राजेश पवार यांचे आभार मानण्यासाठी नांदेड येथे आमदार राजेश पवार यांच्या निवासस्थानी आले होते.
यावेळी आमदार राजेश पवार ,भाजपा महिला मोर्चा दक्षिन जिल्हाअध्यक्ष पुनमताई पवार यांच्या विकास कामांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन धुप्पा गावातील काही कार्यकर्त्यांनी बिनशर्त भाजप पक्षामध्ये प्रवेश केले. विशेष करून बौद्ध समाजातील कार्यकर्ते यांनी भाजप पक्षामध्ये प्रवेश केला आहे.
बौद्ध समाजातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करताना त्याने असे सांगितले की गेल्या 50 वर्षात काॅग्रेस सोबत राहून समाजबांधवासाठी समाज मंदिरासाठी निधी ऊपलब्ध करू शकले नाही. फक्त मताचा ऊपयोग करून घेतले पन आदरणीय आमदार राजेशजी पवार साहेब यांनी आमच्या दलित वस्तीमध्ये स्वता येऊन आमची समस्या विचारून आम्हाला त्या ठिकाणी पिन्याच्या पाण्याची समस्या व समाज मंदिराची मागणी केली होती तर त्याठिकानिच 35 हजार रूपये वैयक्तिक निधि देऊन बोरमध्ये नविन मोटार, पाईपलाईन व ईतर साहित्य घेऊन दिले व 8 महिन्यामध्ये समाज मंदिरसाठि 7 लक्ष रूपये निधि मंजुर करून देणारे एकमेव आमदार राजेशजी पवार साहेबच आहेत.
बोले जैसा चाले या वचनी प्रमाने आम्हाला निधी ऊपलब्ध करून दिल्यामुळे त्यांच्या कार्यावर प्रभावित होऊन बौध्द समाजातील प्रतिष्ठत कार्यकर्ते व ईतर समाजातील कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या भाजप मध्ये प्रवेश केले.यामध्ये शहिद जवानाचे वडिल तूळशिराम हानमंते, सेवानिवृत सैनिक गंगाधर बक्कावाड, सेवानिवृत्त कर्मचारी निवृत्ती बनसोडे, तूकाराम हानमंते, शंकर हानमंते, हानमंत हानमंते, प्रल्हाद भेदेकर, रविद्र हानमंते, विलास गर्दनमारे, चांदू सोनकांबळे, प्रदिप गायकवाड, यादव हानमंते, बालाजी हानमते, पवन बक्कावाड व मोठ्या प्रमाणात महिला कार्यकर्त्या ही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केले आहेत. यावेळी अवकाश पाटील धुपेकर यांची उपस्थिती होती.