पं.स.किनवटचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर…! जखम पायाला अन् टाके डोक्याला…!
किनवट/नांदेड| पंचायत समिती म्हणजे सर्वसामान्य जनतेचा सर्वांगीण विकास करण्याचे मुख्य कार्यालय सर्वसामान्य जनतेची विकासात्मक कामे याचं कार्यालय मार्फत राबविली जातात. मंग ती घरकुल योजना असो की रोजगार हमी योजना नाहीं तर दलित वस्ती सुधार योजना असो की, आदिवासी ठक्कर बाप्पा योजना किंवा तांडा वस्ती सुधार योजना राहो की अगदीं पाणी पुरवठा योजना असोत या सर्वच प्रकारच्या योजना याचं कार्यालय मार्फत राबविल्या जातात. किनवट पंचायत समिती कार्यालय म्हणजे असून अडचण नसून खोळंबा असे झालेले आहे. सर्वसामान्य जनतेचा कामांना नेहमीचं बगल दिली जाते. या कार्यालयाचे काम हे रेल्वेचा वेळापत्रक नुसार चालते. नांदेड वरून सकाळी येणाऱ्या पेसेंजर गाडीने कर्मचारी 11वाजता येतात आणि दुपारी दिड वाजेचा नंदीग्राम गाडीने पळून जातात. कार्यालयात सर्व सामान्य लोकांना अपमानास्पद वागणूक देणे हा तर कर्मचाऱ्यांना छंद जडला आहे.
सर्व सामान्य गोरगरीब जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा पत्रांना तर केराची टोपली दाखवली जात आहे. ग्रामपंचायत सदस्यांना माहिती मिळवण्यासाठी आमरण उपोषणाला बसावे लागतं आहे तरी माहिती हि मिळतच नाही आहे. तक्रार पत्रांना तर हा विभाग ते तो विभाग असा प्रवास करावा लागत आहे. पणं ज्या विभागाचे पत्र आहे त्या विभागाला कधीचं वेळेवर पत्र दिले जात नाही उलट त्याला एकतर गहाळ केले जाते. किंवा वेळ काढू पणा करत त्याला चालढकल करत तक्रार धारकांना फिरवा फिरवी केली जात आहे. काल सामाजिक कार्यकर्ते प्रशांत वाठोरे यांचा सोबत असाच काहीसा प्रकार घडला त्यांनी सादर केलेले पत्र गट विकास अधिकारी यांचा समोर न ठेवता पंचायत विभागाचा कारभारी ने ते पत्र बांधकाम विभाग मधे टपाल मधे पाठवून दिले मुळात ते पत्र विस्तार अधिकारी यांचा कडे कमीत कमी पाठवायला हवे होते.12 दिवसांचा प्रवास करूनही पत्र संबंधित विभागात आले नाही.
सदरील प्रकरणी चौकशी केली जात नाही आणि काम न करताच निधी हडपला जाणार असल्याचे निदर्शनास येताच स्वतः तक्रार धारक पंचायत समितीच्या कार्यालयात येवून माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर असे लक्षात आले की पत्र संबंधित विभागाला मिळालेच नाही आहे.विषय पाणी पुरवठा विभागाचा असताना तो बांधकाम विभाग मधे चौकशी साठी पाठविलेला आढळून आला.म्हणजे ठेचं पायाला लागून जखम झाली अन् त्याचा ईलाज करण्याची वेळ आली तर डोक्याला टाके पाडून मोकळे झाले असाच अनुभव आलेला आहे. सदरील पंचायत समिती मधील कर्मचाऱ्यांचा भोंगळ कारभार खुद्द गट विकास अधिकारी यांचा निदर्शनास आणून दिला तर त्यांना ही आश्चर्याचा धक्काच बसला सदरील प्रकरणी चौकशी करण्याचे त्यांनी सांगत कार्यालयाचा कर्मचाऱ्यांना ताकीद देत कारभार सुधारण्याचा केविलवाणा प्रयत्न करतांना ते दिसले.