कोटलवार परिवार यांच्या वतीने भगवान बालाजी मुर्ती स्थापना निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजन
नवीन नांदेड| श्री भगवान बालाजी मूर्ती स्थापनेचा ३३व्या वार्षीक ब्रम्होत्सव निमित्ताने १ जानेवारी रोजी सुशिल गुरू कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विधीवत पुजा व सालासर भजनी मंडळ यांच्या भजनाचा कार्यक्रम ३१ डिसेंबर रोजी २३ रोजी रात्री आयोजित केले आहे.
प्रतिवर्षी प्रमाणे सर्व भाविभक्तांना कळविण्यात आनंद होतो की, कोटलवार परिवारा तर्फे आयोजीत श्री भगवान बालाजी मंदिर एम.आय.डी.सी. प्लॉट नं. डी.- 52, नांदेड येथे 33 वा वार्षिक ब्रह्मोत्सव मित्ती मार्गशीर्ष कृ. 5 शके 1945 सोमवार, दि. 01/01/2024 रोजी श्री सुशील सुधाकर कुलकर्णी गुरु यांच्या मार्गदर्शन खाली संपन्न होणार आहे. तर भजन कार्यक्रम रविवार, दि. 31 डिसेंबर 23 रोजी रात्री ठिक 9 ते 12 वा. सालासर भजन मंडळ यांचे होणार होईल,सदरील सोहळा पांडुरंग वुडन फर्निचर वर्क्स एम.आय. डी.सी. प्लॉट नं. डी-52, नांदेड.महाप्रसाद येथे दि. 01 जानेवारी 24 रोजी दुपारी 1 ते सायं. 6 पर्यंत असुन या महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन कोटलवार परिवाराने केले आहे.