‘न्याय आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत 23 व 24 जानेवारी रोजी फिरत्या लोक अदालतीचे आयोजन

नांदेड| ग्रामीण भागातील जनसामान्यांना न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचता यावे यासाठी ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेंतर्गत मोबाईल व्हॅनमधून फिरत्या लोकअदालतीचे आयोजन 24 जानेवारीपर्यत करण्यात आले आहे. नांदेड तालुकांतर्गत ग्रामपंचायत विष्णुपुरी येथे 23 जानेवारी व ग्रामपंचायत निळा येथे 24 जानेवारी 2024 रोजी फिरत्या लोकअदालतचे फिरते वाहन पोहोचणार आहे. या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील वादपुर्व प्रकरणे तसेच पो.स्टे. नांदेड ग्रामीण व पो.स्टे. लिंबगांव हद्दीतील प्रलंबित दिवाणी व फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे याठिकाणी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.
‘न्याय आपल्या दारी’ या फिरत्या लोक अदालतीसाठी निवृत्त जिल्हा न्यायाधीश मो. युनुस अब्दुल करीम शेख यांची पॅनल प्रमुख म्हणून तर रिटेनर लॉयर अॅड. मंगेश वाघमारे, मुख्य लोक अभिरक्षक अॅड. ए.व्ही. सराफ, उप-मुख्य लोकअभिरक्षक ॲड. एच.व्ही. संतान यांची पॅनल सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. दिनांक 23 व 24 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वा. पासून फिरत्या लोकअदालतीच्या माध्यमातून कायदेविषयक शिबीरादरम्यान विविध कायद्यांचे मार्गदर्शन होणार आहे. या संधीचा लाभ ग्रामस्थ-नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती दलजीत कौर जज यांनी केले आहे.
जलयुक्त शिवार अभियान 2.0 योजनेतर्गत च्या कामासाठी यंत्रधारकांनी 19 जानेवारीपर्यंत नाव नोंदणी करावी
जलयुक्त शिवार अभियान 2.0 योजनेअंतर्गत विविध यंत्रणेमार्फत सिमेंट नाला बांध बांधणे, गॅबीयन बंधारे, नाला खोलीकरण यासारखे विविध कामे केली जातात. नालाखोलीकरणासाठी शासनाने 4 सप्टेंबर 2017 रोजी परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकान्वये नाला खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामासाठी यंत्रधारकांनी जेसीबी/पोकलेन मशिन उपलब्ध केल्यास त्यांना प्रति घनमीटर इंधनासह जास्तीत जास्त 30 रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याबाबत इच्छूक जेसीबी/पोकलेन यंत्र धारकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छूक यंत्रधारकांनी नोंदणी अर्ज जिल्हा जलसंधारण कार्यालयातून उपलब्ध करून घ्यावीत. तसेच अर्जात यंत्राच्या सविस्तर माहितीसह 19 जानेवारी 2024 पर्यत आपली नावे मृद व जलसंधारण कार्यालयात नोंदवावीत. अधिक माहितीसाठी जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, चैतन्य नगर, नांदेड-5 दुरध्वनी क्रमांक 02462-260813 किंवा कार्यालयाचा ई-मेल eesswcnanded@gmail.com वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा जलसंधारण अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
जलयुक्त शिवार अभियान प्रथम टप्पा तसेच पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम न राबविलेल्या व गाव निवडीच्या निकषानुसार पात्र ठरणाऱ्या गावामध्ये जलसंधारणाची कामे करण्यात येणार आहेत. जलयुक्त शिवार अभियान प्रथम टप्पा तसेच इतर पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविलेल्या व गावांमध्ये पाण्याची गरज असेल व अडविण्यास अपधाव शिल्लक असेल तेथे पाणलोट विकासाची कामे करणे, जलसाक्षताद्वारे गावातील पाण्याची उपलब्धता व कार्यक्षम वापर यासाठी प्रयत्न करणे. तसेच मृद व जलसंधारणाची कामे लोकसहभागातून करणे. उपलब्ध भूजलाच्या माध्यमातून पाणलोट क्षेत्राचा श्वाश्वत विकास करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान 2.0 राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
