नांदेड। आदिवासी ठाकूर ठाकर जमातीच्या वतीने 2 जून 2024 रविवार रोजी साई पालखी निवारा शिर्डी येथे “मी समाजाचा, समाज माझा” या नव विचारातून संघटना विरहित राज्यस्तरीय संवाद यात्रा संपन्न झाली. मुला/ मुलींच्या लग्नाचे वाढते वय यास जबाबदार कोण ? या विषयावर संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
उपस्थित जमात बांधवांच्या शुभहस्ते आदिवासीचे जनक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून संवाद यात्रेची सुरूवात करण्यात आली. प्रारंभी उपस्थित जमात बांधवांचा वैयक्तिक परिचय करून घेण्यात आला . संवाद यात्रेचा उद्देश ,संकल्पना व गरज याबाबत चंद्रकांत सोनवणे यांनी भूमिका स्पष्ट केली ,यानंतर ए.पी.ठाकूर मुंबई व रणजीत शिंदे अमळनेर यांनी संवाद यात्रा अधिक प्रभावशाली कशी करता येईल. तथापि वैवाहिक वाढलेली सामाजिक दरी कमी करण्यासाठी समाज बांधव म्हणून आपण कसे जबाबदार आहोत याबाबत मार्गदर्शन केले .
पहिल्या फेरीमध्ये जमात बांधवांनी मुला/ मुलींचे वाढते लग्नाचे वय यास जबाबदार कोण ? याबाबत वैयक्तिक मनोगत मांडले. दुपारच्या सत्रामध्ये गटचर्चा करण्याच्या उद्देशाने गट क्रमांक एक व गट क्रमांक दोन तयार करण्यात आले. दोन्ही गटांना दिलेल्या विषयाच्या अनुषंगाने खालील प्रमाणे दोन्ही गटाने आपले विचार स्पष्ट केले. यावेळी जमात बांधव अति उत्साहाने कारणे परिणाम आणि उपाय या विषयावरती चर्चा करताना दिसून येत होते. पुढील संवाद यात्रा खानदेश विभागामध्ये लवकरच आयोजित करण्यात येईल असे ठरविण्यात आले. जमात बांधवांना समाज विकासाची शपथ देऊन संवाद यात्रेची सांगता करण्यात आली.
या संवाद यात्रेत सर्वश्री वासुदेव ठाकूर ,भाऊसाहेब पंढरीनाथ ठाकूर,दिनेशकुमार रोहिदास साळुंके, डॉ.मनोहर देवरे,महेश रामराव पवार,दिलीप रघुनाथजी जगताप ,मिलिंद मच्छिंद्र ठाकर , भगवान बापूराव ठाकूर, ज्ञानेश्वर पंडित ठाकूर ,सौ सुलभा महेश पवार,अशोक प्रभाकर सिसोदिया, हिरालाल काशिनाथ पवार ,भाऊसाहेब पंढरीनाथ ठाकूर, तुकाराम देवराम ठाकूर, दिनेश रामदास ठाकूर ,जगन्नाथजी चव्हाण ,भगवान संकपाळ,किशोर कदम,अरुण रामचंद्र ठाकूर ,संतोष संकपाळ, नारायण रामचंद्र ठाकूर ,महेश बाजीराव चव्हाण ,नरेंद्र नारायण साळुंके ,दीपक यशवंत चव्हाण , सुदाम पंढरीनाथ ठाकूर, तुकाराम नामदेव भोसले, मनमोहन विश्वनाथ ठाकूर ,स्वाती मनमोहन ठाकूर, ॲड.अभिजीत दिलीप पवार,विनायक वसंतराव इंगळे ,रामेश्वर चव्हाण, तन्मय सोनवणे,बाबासाहेब पुंजाजी इंगळे ,दत्तात्रय रामभाऊ जगताप, विजय इंगळे, कमलाकरजी चव्हाण,सुजाता कमलाकर चव्हाण,अनिल लोटन पवार, योगिता प्रभूराव साळुंके ,संध्या अभिजीत पवार ,सपना सोनवणे आधी जमत बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महेशजी पवार शिर्डी यांच्या अथक परिश्रमाने सदरची संवाद यात्रा यशस्वी झाली त्याबद्दल जमातीच्या वतीने त्यांचे खूप आभार मानले तर लीलाधरजी ठाकूर, दत्तात्रयजी जाधव, प्रकाशजी भामरे, रामेश्वर ठाकूर ( राम राम पाहुणे छत्रपती संभाजीनगर) जनार्दनजी ठाकूर, योगेश ठाकूर, विजय शालिकराम ठाकूर, विजय जगन्नाथ ठाकूर नाशिक, योगेश ठाकूर कन्नड, रत्नमालाताई सुरडकर, रवींद्र ठाकूर जिल्हा माहिती अधिकारी अहमदनगर, शिवाजी कदम पत्रकार जालना ,रमेश ठाकुर नांदेड व शिर्डी येथील संबंधित पत्रकारांनी संवाद यात्रेस शुभेच्छा दिल्या त्या सर्व समाज बांधवांचे आभार मानले.