हिमायतनगर। हिमायतनगर येथील वृतपत्र विक्रेता केदार ताटेवाड यांना स्व. अंनंतरावर नागापूरकर वृतपत्र विक्रेता पुरस्कार जाहीर झाला आहे.

कारला येथील केदार चंदर ताटेवाड यांनी गेल्या ग्रामीण भागातून पाच वर्षापासून पाच कि. मी. सायकलवर प्रवास करून शहरात वृतपत्र वाटप करण्याचे काम करीत आहे.

केदार ताटेवाड यांनी शिक्षण घेत वृतपत्र विक्रेता म्हणून अल्पशा मानधन घेऊन काम करीत होते. हे करीत असताना आज स्वत वृतपत्र एजन्सी घेऊन आपला व्यवसाय वाढवला आहे. दैनिक पुण्यनगरी सह इतर वृतपत्र खेडे गावातून सकाळी चार वाजता शहरात ऐऊन घरोघरी वृतपत्र वाटप करीत असल्याची दखल घेऊन त्यांना स्व. अंनंतरावर नागापूरकर वृतपत्र विक्रेता पुरस्कार जाहीर झाला आहे.

जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड, प्रकाश जैन,दत्ता शिराणे, अनिल मादसवार,गोविंद गोडसेलवार, सुभाष दारवंडे, सोपान बोंपीलवार, मारोती वाडेकर,नागेश शिंदे, शुद्धोदन हनवते , संजय मुनेश्वर, वसंत राठोड, दाऊ गाडगेवाड, सरपंच गजानन कदम, डॉ गफार, संभा ताटेवाड, सुरेश चपलवाड, यांनी अभिनंदन केले आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version