नांदेड। सहकारातुन समृध्दी कडे नावामनपा पतसंस्थेची वाटचाल झालेली आहे. तिस कोटी भांडवल ही सभासद व संचालक मंडळ यांच्यी ठेव असल्याचे सांगून पतसंस्थेची वाटचाल होऊन वटवृक्ष मध्ये रूपांतर झाले असल्याचे प्रतिपादन माजी उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांनी सर्व साधारण सभेप्रसंगी उपस्थीताना मार्गदर्शन करतांना सांगितले.
नांदेड वाघाळा शहर मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादीत नांदेडची वार्षीक सर्वसाधारण सभा चेअरमन दयानंद गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली २४ सप्टेंबर रोजी कै. शंकररावजी चव्हाण प्रेक्षागृह सभेत संपन्न झाली. यावेळी रत्नाकर वाघमारे यांनी सभासद बांधवाची परिस्थिती आर्थिक कमतरता असल्याने २५ वर्षापासून ही संस्था सभासद बांधवांसाठी धावुन आली असुन, पतसंस्थेची आजची वाटचाल वटवृक्ष झाल्याचे सांगुन सभासद पाल्यांना कन्यादान योजना ही चालू केली असल्याचे सांगितले. या सर्वसाधारण सभेत सभासद गुणवंत पाल्यासह सेवानिवृत्त सभासद सदस्याच्या सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
वार्षिक सर्वसाधारण सभेस प्रमुख पाहुणे म्हणून मनपा अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, माजी उपायुक्त रत्नाकर वाघमारे सहाय्यक आयुक्त संजय जाधव, रावण सोनसळे,संभाजी कास्टेवाड, राजेश चव्हाण, सदाशिव पंतगे,यांचा सह संचालक मंडळ उपस्थितीत होते. प्रारंभी शाहीद जवान व संस्थेचे माजी चेअरमन कै.तानाजी कानोटे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली, व मनपा शाळा क्रमांक १० च्या वतीने मोबाईल वापरण्याचे दुष परिणाम यावर नाटीकाचे सादरीकरण दाखविण्यात आले. तर नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका येथील विविध विभागातील सभासद सेवानिवृत्त अधिकारी सभासद कर्मचारी यांच्या सपत्नीक सत्कार ४८ जणांचा तर सभासद गुणवंत पाल्य असलेल्या ११ जणांचा सन्मान चिन्ह, पुष्प गुच्छ देऊन मान्यवरांच्या व संचालक मंडळ पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी मार्गदर्शन पर भाषणात कर्मचारी पतसंस्थेच्यी वाटचाल यशस्वी होत असल्याचे सांगून वेळोवेळी मनपाने सहकार्य केले असल्याचे सांगितले. प्रास्तविक चेअरमन दयानंद गायकवाड यांनी केले. यावेळी विविध विषयांवरील विषयांना मंजुरी देण्यात आले. यात विशेष नफा तोटा पत्रक व ताळेबंद पत्रकास मान्यता यासह सभासद कर्ज मर्यादा रु. ७, लाखांवरून रु१० लाख वाढ करुन संस्थेच्या आर्थिक परिस्थिती नुसार टप् टप्प्याने कर्ज वितरित करणे, सभासदांच्या पाल्यांसाठी उच्च शिक्षणासाठी करिता लॅपटॉप घेण्यासाठी मंजुरी देणे या विषयावर चर्चा करून मंजुरी देण्यात आली. आभार आशाताई घुले सहशिक्षीका यांनी केले, सभा यशस्वी होण्यासाठी उपाध्यक्ष तौसिफ अली, सचिव जी. व्ही.नागरगोजे,संचालक एम.सी.कांबळे, एस.व्हि. बाबरे, पि.एस. जाधव, एस.व्ही.जौधंळे, अब्दुल हबीब, एन.एम.लंगडे, यांच्या सह कर्मचारी ए.जी.सरोदे, एस.एस.गोरे, के.बी.खूपसे एस.आर. वाघमारे यांनी परिश्रम घेतले.