हिमायतनगर, दत्ता शिराने। हिमायतनगर शहरातील रहिम काॅलनी मधून महिंद्रा बोलेरो पिक अप चारचाकी वाहन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे. हि घटना दि. १८ रात्री २ वाजताच्या सुमारास घडली आहे. फिर्यादी जहूर शेख मसूद शेख यांच्या फिर्यादीवरून हिमायतनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत.
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातील रहिम काॅलनी भागात शेख मसूद यांच्या मालकीची महिंद्रा बोलेरो पिक अप एम. एच. २६ ए. डी. ५६३५ ही गाडी रोजच्या प्रमाणे आपल्या घरासमोर लावून रात्री झोपी गेले. दि. १९ सकाळी उठून बघीतले असता गाडी दिसून आली नाही. सकाळ पासून दिवसभर सर्वत्र गाडीचा शोध घेतला, परंतू सदरची गाडी मिळून आली नाही. म्हणून फिर्यादी जहूर शेख मसूद शेख यांनी हिमायतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक बिरप्पा भुसनूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाॅ. श्रीमती कोमल कागणे, पो.ना. नागरगोजे हे अधिक तपास करीत आहेत.
या संदर्भात पोलीस निरीक्षक भोसले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की आमचा तपास सुरू आहे सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज आम्हालाही प्राप्त झाले असून लवकरच आरोपींना जर बंद करू असा विश्वास त्यांनी न्यूज फ्लॅशच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला आहे.