ईश्वराची भक्ती आणि संतांची संगती हाच सुख समाधानाचा मार्ग – वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज
उस्माननगर, माणिक भिसे| पृथ्वीतलावरील प्रत्येक मानव हा खरा सुखाच्या व समाधानाच्या शोधात असतो , अवघ्या विश्वामध्ये सर्वांची धडपड जीवनामध्ये सुख, शांती आणि समाधान लाभावे म्हणूनच सुरू असते . संसार उद्योग , व्यवसाय व नोकरी करीत असताना दैनंदिन जीवनाच्या रहाटगाड्या मध्ये माणसाला सुख , शांती आणि समाधान पाहिजे असेल तर साधु संतांची संगत आणि ईश्वराची भक्ती हाच एकमेव राजमार्ग आहे असे प्रतिपादन युवासंत श्री.श्री.१०८ सद्गुरू दिगंबर शिवाचार्य महाराज यांनी केले.
उस्माननगर येथील अखंड दत्तनाम सप्ताह सोहळ्यात भक्तांना आशिर्वाचन देताना म्हणाले की, ‘हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा…’ या अभंगाच्या संदर्भातून देवाचा किंवा देवाला तुझा विसर होऊ नये. सतत दत्तनामाच्या जपात भक्तांच्या मनी ध्यास लागवा. हेच मागणे युवासंत श्री श्री 108 सदगुरू दिगंबर शिवाचार्य महाराज यांनी उस्माननगर येथील दत्तनाम सप्ताह सोहळ्याच्या निम्मिताने भगवंताकडे मांडले. आजच्या या कलियुगात माणसाला माणूस बननिण्यासाठी अध्यात्माकडे नवतरुणांनी आले पाहिजे. जेणेकरून हजारो वर्षांची असलेली आपली हिंदू परंपरा या परंपरेला ऋषीमुनींचा असलेला इतिहास हा अत्यंत मानवतेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे.
समाजाच्या उन्नतीसाठी समाजाला योग्य दिशा दाखविण्याचे कार्य स्वत:जिझून समाज परिवर्तन करण्यात कसोशीने प्रयत्न करणारे संत मंडळी हे अत्यंत महत्वाचे आहे. ध्येयाला जो झिझवतो तो संत होय. दत्तात्रयांच्या अवतारात संत महंतांना अनन्य साधारण महत्व आहे. जप आणि तप हे दत्त सांप्रदायामध्ये अग्रक्रमांकावर आहे. या भारत देशात अनेक सांप्रदाय आहे. पण ध्येय मानवेतच्या उध्दारासाठी प्रत्येक सांप्रदायातील संत, महंत कार्य करीत असतात. अनेक तरुणांनी अध्यात्माचा मार्गात येऊन आपले जिवन सार्थक करावे. देवाकडे एकच मागणे आहे. तुझा विसर न आम्हा व्हावा…हीच दत्तनामाची ख्याती आहे. आजच्या या धावपळीच्या युगात माणूस माणसापासून दुरावत आहेत. गुरू आणि शिष्यांच नात खंडीत होण्याची वेळ येते की काय ? असाही प्रश्न आजच्या या आधुनिक युगात येते की काय ? पण देव हा सर्वश्रेष्ठ आहे. श्रध्दा सबुरी या शब्दात खूप मोठे सामर्थ्य आहे.
आपली संस्कृती ही दान देण्याची आहे. ही संस्कृती अत्यंत मौल्यवान आहे. या संस्कृतीला जपले पाहिजे. हीच काळाजी खरी गरज आहे. या संस्थाचे विश्वस्त वैराग्य मृर्ती अवधूतबन महाराज यांनी संतांचा मेळा या दत्तनाम सप्ताहाच्या निमित्ताने घडऊन आणला. उस्माननगर परिसर हा अत्यंत भक्तीमय वातावरणाचा केला. हा योग अत्यंत महत्वाचा आहे. हे केवळ या महंतांच्या विचारधारेने हा परिसर फुलला. असे गौरव उद्गार या महंत वैराग्यमुर्ती अवधूतबन गुरूशंकरबन महाराजांबद्दल विरशैव सांप्रदायाचे युवकांचे प्रेरणास्त्रोत युवासंत दिगंबर शिवाचार्य महाराज यांनी आपल्या अमृतवाणीतून काढले. या किर्तन सोहळ्यासाठी भक्तगण मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
या दत्तानाम सप्ताहाच्या किर्तन सोहळ्यासाठी पेटीवादक रामकिशन वारकड, गायक बालाजी वारकड, वामन डांगे, शिवहार महाराज मठपती, प्रल्हाद पाटील घोरबांड, चांदु पाटील घोरबांड, बालाजी पाटील घोरबांड, व्यंकट कौठकर, केशव काळम तसेच महिला मंडळ यांच्या योग्य नियोजनाने दिवसेंदिवस या सप्ताहात रंगत वाढत चालली आहे व भक्तीमय वातावरण दिसून येत आहे. वैराग्यमुर्ती अवधुतबन गुरू शंकर बन महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व नियोजनाखाली धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहे.
मृदांगाचार्यांनी गाजवला किर्तन सोहळा
कुठलीही साधना करण्यासाठी मानवाला एकाग्रतेची व परिश्रमाची गरज असते. ध्यानसाधना जर केली तर कुठलीही गोष्ट मानवासाठी अशक्य नाही. असाच अत्यंत आपल्या मृदंगाच्या आवाजात बोले तसे चाले त्याची वृंदावी पाऊले… असा आवाज आपल्या बोटांनी त्या मृदंगावर टाकून किर्तनात रंगत आणली. असे मृदंगाचार्य केदार सुगावे व प्रभाकर पाटील घोरबांड यांनी आपल्या मृदंग वादनाने मने प्रफुल्लीत केली.