नांदेड डाकघर विभागाच्यावतीने जिल्ह्यात आधार शिला 2.0 विशेष मोहिमेचे आयोजन

By
NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या,...
2 Min Read
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!

नांदेड| नांदेड शहरातील सर्व नागरिकांना आधार संबधी सर्व सुविधा देण्यासाठी नांदेड डाक विभाग मार्फत 14 मार्च 2024 पर्यत आधार शिला 2.0 नावाची विशेष मोहिम सुरु केलेली आहे. या मोहिमेअंतर्गत नांदेड शहरातील पुढील टपाल कार्यालयात आधार नोंदणी व आधार अद्यातीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

ही सुविधा नांदेड प्रधान डाक घर, शिवाजीनगर उप डाक घर, सिडको उप डाकघर, इतवारा उप डाक घर, तरोडा रोड उप डाक घर या व्यतिरिक्त नांदेड जिल्ह्यात तालुकास्तरावरील पुढील कार्यालायात आधार नोंदणी व आधार अद्यातीकरण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात किनवट उप डाकघर, माहूर उप डाकघर, भोकर उप डाकघर, हदगाव उप डाकघर, देगलूर उप डाकघर, कंधार उप डाकघर, बिलोली उप डाकघर, लोहा उप डाकघर, धर्माबाद उप डाकघर, मुखेड उप डाकघर व नायगाव उप डाकघर समावेश आहे.

सर्व नागरिकांनी या निमित्ताने या मोहिमेअंतर्गत जास्तीत जास्त संख्येने आधार नोंदणी व अद्यातीकरण करून या संधीचा लाभ घ्यावा. तसेच ज्यांना कुणाला आपल्या प्रभागामध्ये विशेष आधार कॅम्पचे आयोजन करावयाचे असेल त्यांनी अधीक्षक डाकघर नांदेड कार्यालय नांदेड मो. 8668633396 येथे संपर्क साधावा, असे आवाहन नांदेड विभाग नांदेडचे अधीक्षक डाकघर यांनी केले आहे.

आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरीकासाठी अत्यंत आवश्यक असलेले ओळखपत्र आहे. या दस्तऐवजामुळे नागरिकांना विविध प्रकारच्या सरकारी योजनांचा लाभ घेणे शक्य होते. शिवाय पेंशन, बँक खाते, डीजिटल नोंदणी अशा अनेक सुविधा मिळतात. जर एखाद्या व्यक्तीकडे आधार कार्ड नसेल तर त्या व्यक्तीला शासनाद्वारे दिल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ घेता येणार नाही.

तो व्यक्ती या योजनेपासून वंचित राहतो. अशा या महत्वाच्या दस्तऐवजामध्ये व्यक्तीचे नाव, पत्ता, वय, लिंग, जन्म तारीख आदी माहितीमध्ये काही कारणास्तव बऱ्याच वेळा बदल करावा लागतो व त्यासाठी तासान तास आधार केंद्रावर रांगेत थांबावे लागते. या सर्व अडचणीवर मात करण्यासाठी या मोहिमेचे आयोजन केले आहे, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे नांदेड विभागाचे अधीक्षक डाकघर यांनी कळविले आहे.

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!