भोकर। राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर व ग्रामीण रुग्णालय भोकर वैद्यकीय अधिक्षक डॉ.अनंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार व आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार यांच्या नियोजनानुसार आज दि. ३ मार्च रोज रविवारी भोकर शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम अंतर्गत वय वर्ष ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना लस पाजविण्या करीता २१ बुथ, ३ ट्रांझिट टिम व १ मोबाईल टिम तयार करण्यात आले होते.

बूथवर अपेक्षित लाभार्थी ३९४५ होते त्यापैकी ३५६८ लाभार्थी ( ९०.४४ टक्के) यांना पोलिओ लस पाजविण्यात आली. पुढील पाच दिवस गृह भेटी द्वारे (आयपीपीआय) भेट देवून पोलिओ लस पासून वंचित राहिलेल्या बालकांना पोलिओ लस पाजविण्यात येणार आहे.
जिल्हास्तरीय पथक डॉ अवसरे आर.डी., विठ्ठल कदम यांनी भोकर शहरातील काही बुथ ठिकाणी पाहणी केली.

सदरील मोहीम मध्ये ग्रामीण रुग्णालय भोकर येथील डॉ सागर रेड्डी, डॉ व्यंकटेश टाकळकर, डॉ अविनाश गुंडाळे, आरोग्य निरीक्षक सत्यजीत टिप्रेसवार, सहाय्यक अधिक्षक संजय देशमुख, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मनोज पांचाळ, अधिपरीचारीका निलोफर पठाण, दिपके, संगिता महादळे, ज्योती शेंडगे, भालेराव, औषध निर्माण अधिकारी संदीप ठाकूर, मल्हार मोरे, गिरी रावलोड, आरोग्य कर्मचारी नामदेव कंधारे, आरोग्य सेविका मुक्ता गुट्टे, संगीता पंदीलवाड, सरस्वती दिवटे, स्वाती सुवर्णकार, वाहनचालक रवि वाठोरे, सोहेल शेख, शिंदे मामा, हत्तीरोग कर्मचारी मोरे विठ्ठल, रामराव जाधव, गणेश गोदाम,इंदल चव्हाण, रवींद्र चव्हाण, ज्ञानेश्वर खोकले, राजु चव्हाण, मारोती गेंदेवाड, स्वयंसेवक शिवम गोदाम, अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस, स्वयंसेवक, राम रतन नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थ्यानी यांनी सहभाग घेतला.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version