नृसिंह नरोबा मंदिर कौठा येथे नृसिंह जन्मोत्सव ऊत्साहात साजरा, सप्ताहाची आज महाप्रसादाने सांगता
नवीन नांदेड। श्री नृसिंह नरोबा मंदीर बसवेश्वर नगर जुना कौठा नांदेड येथे श्री नृसिंह जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी जुना कौठा भागातून उत्सव मुर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली तर मंदिरात सायंकाळी सात वाजता जन्मोत्सव निमित्ताने महाआरतीने करण्यात आली.
यावेळी महिला पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर १५ ते २२ मे पर्यतं अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते शिव पुराण कथा प्रवक्ता हभप बालाजी महाराज गुडेवार यांच्या समधुर वाणीतून दररोज दुपारी १ ते ४ दरम्यान आयोजित करण्यात आली होता तर जिल्हा परिषद बळीरामपुर सदस्य नांदेडचे गंगाप्रसाद काकडे यांच्या वतीने २२ मे रोजी दुपारी १२ वाजता महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे.
दरवर्षी प्रमाणे याही १४व्या वर्षी १५ ते २२ मे दरम्यान शिवपुराण कथा दररोज दुपारी १ ते ४ दरम्यान व श्रीनृसिंह जन्मोत्सव निमित्ताने सप्ताहातील दैनिक कार्यक्रम काकडा पहाटे ५ ते ६,अभिषेक सकाळी ६ ते ७ ज्ञानेश्वर पारायण ,गाथा भजन ,शिवमहापुराण कथा दुपारी ,हरिपाठ हरी किर्तनकार आयोजित करण्यात आले होते तर ह.भ.प.श्री माधव महाराज येलूरकर, ह.भ.प.श्री परमेश्वर महाराज शहापूर, ह.भ.प.श्री गंगाधर महाराज वसूरकर ह.भ.प.सौ.मैनाताई हिंपळनारीकर, ह.भ.प.श्री तुकाराम महाराज मंडगीकर, ह.भ.प. श्रीदता महाराज महाराज वळसंगवाडी ह.भ.प.श्री बालाजी महाराज गुडेवार यांच्ये किर्तन आयोजित करण्यात आले होते.
नृसिंह जन्मोत्सव निमित्ताने २१ मे रोजी सकाळी महाअभिषेक, महाआरती श्री मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली, यावेळी परिसरातील अनेक भागात महिलानी या भव्य मिरवणूकीचे स्वागत व पुजन करण्यात आले,यावेळी विश्वस्त अध्यक्ष गंगाप्रसाद काकडे, माजी नगरसेवक राजु गोरे, निळकंठ काळे, यांच्या सह विश्वस्त मंडळ पदाधिकारी यांच्यी उपस्थिती होती,मुख्य पुजारी व्यंकटेश गुरू यांच्या मंत्रोपंचाराने विधीवत यजमान यांच्या हस्ते पुजन करण्यात आले.
मिरवणूकीत सहभागी झालेल्या महिला पुरुष, भाविक भक्तांना थंडपेय मठा चे वाटप जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे यांच्या निवासस्थाना समोर करण्यात आले तर बालाजी देऊळगावकर यांच्या वतीने उपस्थित भाविकां साठी महाप्रसाद आयोजन करण्यात आले. नृसिंह जन्मोत्सव निमित्ताने मंदीर परिसरातील सजावट व रोषणाई करण्यात आली होती,२२ मे रोजी दुपारी १२ वाजता मंदिर अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य बळीरामपुर गंगाप्रसाद काकडे यांच्या वतीने महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे, या महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिर विश्वस्त समिती व पुजारी व्यंकटेश गुरू यांनी केले आहे.