श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। किनवट-माहूर मतदार संघात आमदार भीमराव केराम यांचे प्रतिनिधित्व असतांना लोकसभा निवडणुकीच्या काळात या मतदार संघातून मोठ्या प्रमाणात लिड मिळावी, यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यासह कार्यकर्त्यांनी जिवाचं राण करुण खा.नागेश पाटील आष्टीकर यांना निवडून देत लिड दिली. परंतु उबाठा गटाचे खा.नागेश पाटील आष्टीकर यांना जणू या किनवट-माहूर मतदार संघाचा विसरच पडला आहे.लोकसभेच्या निकालात निवडून आल्यापासून ते या मतदार संघाकडे फिरकलेच नसल्याने ‘खासदार गेले कुणीकडे’ म्हणण्याची वेळ आता संघातील नागरिकांवर आली आहे.

लोकसभा निवडणुकीत अनेक मातबरांना धक्का देत हिंगोली लोकसभेतून खा.नागेश पाटील आष्टीकर  यांना उबाठा गटाकडून उमेदवारी मिळाली. या निवडणुकीत खा.आष्टीकर यांच्या विरोधात हदगावचे अतिषय मनमीळावू असलेले शिंदे सेनेचे उमेदवार बाबुरावजी कदम, वंचीतचे बी.डी चव्हाण तर इतर पक्षातील नेतेमंडळी उभी होती.असे असतांना या भागातील महाविकास आघाडीतील नेत्यांनी जिवाचं राण करुण आष्टीकरांना निवडूण आणण्याचा चंग बांधला होता तर मतदारांनी हि जातीपातीचं राजकारण न करता जवळपास १४ हजारी लीड दिली.

या भागातील विद्यमान आमदार भीमराव केराम हे असतांना यांच्या विरोधात आष्टीकर यांना प्रचंड मते दिली. असे असतांना सध्याचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी तिसर्‍याच महिण्यात या किनवट-माहूर भागाकडे दुर्लक्ष केले आहे.ऐवढेच नाही तर महाविकास आघाडीतील नेत्याकडे हि दुर्लक्ष होत असल्याची चर्चा असून, यामुळे या भागातील मतदारांच्या चांगल्याच अपेक्षा भंग झाल्याचे पहावयास मिळत आहे. भाजपाचा बालेकिल्ला भेदून खासदार झालेल्या नागेश पाटील यांचे सुरुवातीला हिंगोली लोकसभेच्या पातळीवर चांगलेच कौतुक झाले.

तर दमदार शिवसेनेचे (उबाठा) जिल्हा प्रमुख म्हणून नांदेड जिल्ह्यात चांगलेच वजन दिसल्याने किनवट-माहूर मतदारसंघाच्या विकास कामांना चांगली गती मिळेल अशी येथील मतदारांची धारणा होती. परंतु नागेश पाटील यांनी विजय मिळवल्यानंतर किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाकडे दुर्लक्ष करीत व उदासीनता दाखवत त्यांनी आपले दर्शन केवळ दिल्ली आणि मुंबईतून टिव्हीवरूनच दिल्याने सध्या ह्या मतदार संघाचा कारभार उंटावरून शेळ्या हाकल्याप्रमाणे होत असल्याची चर्चा सध्या या मतदार संघात दबक्या आवाजात सुरू आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version