ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेचा मेळावा संपन्न ; “भाऊरावच्या” व्यवस्थापनास सीटूने दिले निवेदन

नांदेड। सीटू संलग्न महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेचे राज्य सरचिटणीस कॉ.प्रा.डॉ.सुभाष जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.२२ रोजी एमजीएम कॉलेज समोरील सीटू कार्यालयात ऊसतोडणी व वाहतूक कामगारांचा मेळावा घेण्यात आला. सीटू संघटनेच्या वतीने डॉ.डी.एल. कराड आणि डॉ. सुभाष जाधव यांच्या नेतृवखाली अन्य संघटनांना बरोबर घेऊन राज्यात मोठा लढा करण्यात आला.त्यामुळे ऊसतोडणी व वाहतूक दरात ३४% वाढीचा व कमिशन दर २०% करणारा सामंजस्य करार करावा लागला आहे.
ऊसतोडणी व वाहतूक कामगार वर्षानुवर्षे उपेक्षितच होते.त्यांना संघटित करण्यासाठी सीटू कामगार संघटनेने अथक परिश्रम घेतले म्हणून ऊसतोडणी व वाहतूकदार तसेच मुकादम यांच्यासाठी राज्यात कल्याणकारी महामंडळ स्थापन आले. केवळ आणि केवळ संघटनाच उपरोक्त ऊसतोडणी कामगारांना न्याय देऊ शकते.-कॉ.प्रा.डॉ.सुभाष जाधव,राज्य सरचिटणीस सीटू संलग्न,महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटना
नांदेड जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने या कराराची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करीत आहेत.तसेच वीस वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर ऊसतोडणी व वाहतूक कामगार, मुकादम,वाहतूकदार यांचेसाठी संघटनेच्या रेट्यामुळे सरकारला कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे लागले.परंतु गेली दोन वर्षे त्यांची नोंदणी व प्रत्यक्ष लाभ सुरु करण्याचे काम रखडलेले आहे. या संदर्भात राज्य शासन व साखर संघ प्रचंड उदासीन असून जिल्ह्यातील ऊसतोडणी वाहतूकदार,मुकादम यांच्या मागण्या संदर्भात चर्चा करून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदरील मेळावा घेण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करण्यासाठी ऊसतोडणी व वाहतूक संघटनेचे राज्य सरचिटणीस तथा अभ्यासक कॉ.प्रा.डॉ. सुभाष जाधव (कोल्हापूर) जेष्ठ कामगार नेते कॉ.विजय गाभने, जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड,जिल्हाध्यक्षा कॉ.उज्वला पडलवार, राज्य कमिटी सदस्या कॉ. करवंदा गायकवाड, जेष्ठ नेते कॉ.अरुण दगडू आदींनी मार्गदर्शन केले. मेळावा संपन्न झाल्यावर सीटूचे पदाधिकारी हे नांदेड जवळील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना लिमिटेड देगांव – येळेगाव ता.अर्धापूर येथील कारखान्यात कामगारांच्या आग्रहा खातर पोहचले आणि तेथे पेट्रोल पंपा जवळ गेट मिटिंग घेण्यात आली. जिल्हास्तरीय मेळावा असल्यामुळे भाऊरावचे बहुतांश कामगार एकदिशीय सुट्टीवर होते.
येळेगाव साखर कारखान्यात झालेल्या द्वार सभेत कॉ.डॉ.सुभाष जाधव, कॉ.गंगाधर गायकवाड,कॉ.उज्वला पडलवार आदींनी कामगारांना संबोधित केले. यावेळी मोठ्या संख्येने महिला पुरुष कामगार उपस्थित होते.कारखाना व्यवस्थापनाच्या वतीने कार्यकारी संचालक एस.आर.पाटील आणि मुख्य शेतकी अधिकारी ए.बी.शिंदे यांनी डॉ.सुभाष जाधव व कॉ.उज्वला पडलवार यांचा संघटनेचे प्रतिनिधी म्हणून शाल देऊन सन्मान करण्यात आला.
मेळावा यशस्वी करण्यासाठी कॉ. श्याम सरोदे, कॉ.जयराज गायकवाड, कॉ.लता गायकवाड, कॉ. मारोती केंद्रे, कॉ.मंगेश वट्टेवाड,कॉ. सोनाजी कांबळे,कॉ.गंगाधर खुणे, कॉ.पंढरी बरुडे आदींनी परिश्रम घेतले यावेळी हंगामी कमिटी निवडण्यात आली असून अध्यक्ष पदी देवानंद कुंचेवार तर सचिव पदी मनोहर सूर्यवंशी यांची एकमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदाची जबाबदारी प्रवीण राठोड व भागवत सारुक तर सहसचिव म्हणून श्रीनिवास चवरे व रंगनाथ चाटे यांच्यावर देण्यात आली.
पुढील काळात लवकरच सभासद नोंदणी करून जिल्हाधिकारी,सह संचालक साखर, सहाय्यक समाज कल्याण आयुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त आणि जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड यांच्या सोबत बैठका घेऊन ऊसतोडणी व वाहतूक कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करून निवेदने देण्यात येणार आहेत व प्रश्न सोडविण्यात येणार आहेत.
ऊसतोडणी कामगार गणेश गडंबे, मारोती पागे,लक्षमण मोरे, साहेबराव वाघमारे,धनंजय तिडके,प्रल्हाद तिडके,संजय परगाडे, अक्षय बत्तलवाड,पंडित नादरे आदींनी संघटना बांधणीसाठी पुढाकार घेतला आहे.अशी माहिती सीटूचे जिल्हा जनरल सेक्रेटरी तथा महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक संघटनेचे जिल्हा निमंत्रक कॉ.गंगाधर गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
