क्रीडानांदेड

कोल्हापूरच्या विक्रम गायकवाडने श्री परमेश्वर यात्रेतील कुस्तीचा फड जिंकला; दुसरी मानाची कुस्ती बोरगडीचा पैलवान निलेश शंनेवाडने जिंकली

हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहरात आयोजित करण्यात आलेल्या कुस्त्याचा फड तळपत्या उन्हात रंगला. भारतात प्रसीध्द श्री परमेश्वर मंदिराच्या यात्रेतील सर्वात महत्वाचा व शेवटचा कुस्तीची दंगलीच्या फडास दि.22 मार्च शुक्रवारी दुपारी 01 वाजता बालमल्लाच्या संत्र्या मोसंबीच्या कुस्तीने सुरुवात झाली. यामद्ये शेवटची अव्वल नंबरची मानाची कुस्ती कोल्हापूर येथील पैलवान विक्रम गायकवाड याने जिंकुन सबंध महाराष्ट्रात कुस्तीचा फड गाजविला आहे. तसेच महिला कुस्तीपटू नी यात्रेत खळबळ उडवून दिली. त्याच्या कुस्ती कौशल्याबद्दल बद्दल सर्व कुश्ती शौकीनांनी अभीनंदन करुन त्यांना डोक्यावर घेऊन बजरंग बली कि जय… जय श्रीरामाच्या जयघोषात श्री परमेश्वर मंदिरापर्यंत भव्य मिरवणुक काढली होती.

गेल्या पंधरा दिवसापासून सुरु असलेल्या हिमायतनगर येथील श्री परमेश्वर यात्रेचा शेवट भारतीय खेळात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या कुस्तीच्या स्पर्धानी झाला. लहान मोठ्या बालकांच्या कुस्त्या सकाळी 10 वाजल्यापासुन सुरु झाल्या त्यात 10, 20, 30, 50,100, 200 रुपयाच्या कुस्त्या सुरु होत्या. शेवटची मानाची प्रथम क्रमांकाची कुस्ती जीकणा-या पैलवानासाठी 21000 रुपये बक्षीस बजरंग दलाच्या वतीने तर दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस जिंकणाऱ्या पैलवनास 11000 रुपयाचे बक्षीस व चांदीची गदा भाजप तालुकाध्यक्ष गजानन चायल यांच्या वतीने ठेवण्यात आले होते. तर तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस 5000 रुपये पत्रकार नागेश शिंदे यांच्या वतीनेठेवण्यात आले होते.

मानाची पहिली कुस्ती विक्रम गायकवाड व शंतनू पैलवान नांदेड या दोघाच्या तुल्यबळ लढतीत संपन्न झाली. हलगीच्या तालावर सुरु असेलल्या कुस्तीच्या फडात विक्रम गायकवाड या पैलवानांने प्रतिस्पर्धी पैलवनास चित्त करून अव्वल नंबरचे बक्षीस जिंकले, तर दुसरा दुसरी मानाची कुस्ती बोरगडीचा पैलवान निलेश शंनेवाडने जिंकली तर तिसरा नंबर राजू कदम नांदेड याने जिंकली.

त्यानंतर 2000 रुपयाच्या 10 कुस्त्या, 1001 रुपयाच्या 20 कुस्त्या, तसेच वैयक्तीक कुश्ती शौकीनांनी लावलेल्या 1000 व 500 च्या अश्या मिळुन 100001 रुपायाच्या कुस्त्या तळपत्या उन्हात यात्रा कमेटीचे अध्यक्ष श्री लक्ष्मणरावजी शक्करगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष सुभाष शींदे, विठ्ठल ठाकरे, सचीव अनिल भोरे, श्री परमेश्वर मंदिर समीतीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांच्या उपिस्थतीत पार पडल्या.

यामध्ये पुसद, यवतमाळ, गंगाखेड येथील 16 वर्षीय चिमुकलीने 1000 रुपयाच्या तीन कुस्त्या जिंकुन हम..भी किसी से कम नही..असे दाखऊन दिले आहे. कुस्तीच्या रंगतदार फड पाहण्यासाठी हदगंाव, हिमायतनगर, किनवट, भोकर, उमरखेड, पुसद, तेलंगणा राज्यांसह अन्य दुर-दुरच्या ठिकाणाहुन हजारों पैलवान व कुस्ती शौकीनांनी हजेरी लावली होती. मानाची प्रथम कुस्ती पटकावीणा-या पैलवानास वर उचलुन बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करत बॅेडबाज्याच्या गजरात श्री परमेश्वर मंदिरापर्यंन्त मिरवणुक काढली.

यावेळी मंदिर संस्थानचे उपाध्यक्ष श्री महावीरचंदजी श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंतराव देवकते, वामनराव बनसोडे, राजाराम झरेवाड, एड दिलीप राठोड, अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, गजानन मुत्तलवाड, संतोष गाजेवार, ज्ञानेश्वर शिंदे, अन्वर खान, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, मारोती हेंद्रे, राजु गाजेवार, बाबुराव पालवे, बाबुराव भोयर, अशोक अनगुलवार, रामराव सूर्यवंशी, अडबलवाड सर, प्रभाकर मुधोळकर, रामभाऊ सूर्यवंशी, गोविंद शिंदे, कैलास डांगे, बाळू हरडपकर, श्याम पाटील, विपुल दंडेवाड, पापा पार्डीकर, वैभव डांगे, दुर्गेश मांडोजवार, कदम सर, सितु सेवनकर, यांच्यासह अनेकांच्या उपस्थितीत विजेत्या मल्लाना गौरविण्यात आले. कुस्तीचा फड व यात्रेतील सुरक्षेसाठी पोलीस निरीक्षक जऱ्हाड व पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त लावला होता. त्यामुळे कोणतेही गालबोट न लागता यात्रा उत्सव शांततेत संपन्न झाला.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!