नायगाव, रामप्रसाद चन्नावार| नायगाव येथे शिवसेना शिंदे गटाची आगामी निवडणुका व पक्ष विस्ताराच्या उदात्त हेतूने नांदेड लोकसभा पक्ष निरीक्षक दिलीपराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरें गटाच्या 30 कार्यकर्त्यांचा शिंदे सैनेत प्रवेश झाला.
शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शनिवार दिनांक 23 डिसेंबर रोजी शहरातील जयराज पॅलेस येथे ठीक सकाळी 11:00 वाजता नायगाव विधानसभा व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या तयारीच्या उद्देशाने मतदारसंघात पक्षविस्तार व पक्ष मजबुतीकरणाच्या दृष्टिने पदाधिकारी निवडी, बुथ प्रतिनीधी, शिवशक्ती प्रमुख नेमणूक करण्याच्या व्यापकतेसाठी बैठक घेऊन, उपस्थित कार्यकर्त्यांना लोकसभा निरिक्षक दिलीपराव शिंदे यांनी मार्गदर्शन ही केले.
यावेळी दिलीपरावजी शिंदे नांदेड लोकसभा निरीक्षक, नायगाव विधानसभा जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, गंगाधर बडूरे संपर्कप्रमुख चंद्रपूर, महिला आघाडी नांदेड जिल्हाप्रमुख सौ.गिताताई पुरोहित, नायगाव तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बेलकर, उपजिल्हा प्रमुख प्रल्हाद पिंपळे, महिला शहर प्रमुख विजयमाला गंगावणे, मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे नायगाव विधानसभा समन्वय शुभम बैनवाड आदी प्रमुखांसह अमर शेख, शिवराज मिरकूटे, केशव शिंदे, निजाम शेख, जयवंत बेलकर, ज्ञानेश्वर सुर्येवाड, शिवराज पवळे, नरबा गंधकवाड ,राजेश मोरे, ताजोदिन शेख, प्रकाश बेलकर, गणेश ईबितदार आदींची उपस्थिती होती.
उद्धव ठाकरें गटाच्या 30 कार्यकर्त्यांचा शिंदे सैनेत प्रवेश
तालुक्यातील उद्धव शिवसेना गटाचे सक्रिय कार्यकर्ते नरबा गदकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुगाव येथील उद्धव . सेनेच्या 30 कार्कर्त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे…..