उस्माननगर, माणिक भिसे| भारताचे माजी पंतप्रधान, ज्येष्ठ कवी , भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त उस्माननगर येथील भाजपा कार्यकर्ता कडून प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते तथा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि माजी सरपंच तुकाराम वारकड गुरूजी , भाजपा तालुकाउपाध्यक्ष तथा तेलंगवाडी चे मा.सरपंच सुरेश मामा बास्टे, चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य रुद्र ( संजय) वारक , नारायण पाटील घोरबांड ,( ग्रा.पं.सदस्य) शिवशंकर काळे ( ग्रामपंचायत सदस्य) मारोती घोरबांड ( सामाजिक कार्यकर्ते ग्रा.प.स.प्रतिनिधी ) आदीची उपस्थित होती.
यावेळी वारकड गुरूजी यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्याचा आढावा घेतला. देशासाठी ऐतिहासिक निर्णय घेऊन गोरगरिबांना न्याय मिळवून दिला.त्यांच्या निर्णयांचा अनेकजण आदर्श घेत आहेत. यासह अनेक गोष्टींची चर्चा करून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले.