२८ नोव्हेंबर रोजी मुंबई मंत्रालयावर मोर्चा ; कामगारांनी मोर्चात सामील व्हावे – कॉ.गंगाधर गायकवाड
नांदेड। कामगार,कष्टकरी आणि शेतकऱ्यांचा विविध मागण्यासाठी दि.२८ नोव्हेंबर रोजी मुंबई मंत्रालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.वाढत्या महागाईच्या काळात मानधनात आणि वेतनात कपात करून कामगारांना वेठीस धरण्याऱ्या सरकारच्या विरोधात सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) च्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे.
या मोर्चा मध्ये शेतकरी देखील मोठ्या संख्येने सामील होणार आहेत.जिल्ह्यातील शालेय आहार कामगार,आशा व गटप्रवर्तक, असंघटित कामगार,कंपनी कामगार, घरेलू कामगार, बांधकाम कामगार,फेरीवाले,सफाई कामगार, वन कामगार, देवस्थान कर्मचारी सामील होण्यासाठी जिल्हाभर बैठका घेऊन जन जागृती करण्यात येत आहे.
या मोर्चा मध्ये जिल्ह्यातील सर्व कामगारांनी सामील व्हावे असे आवाहन सीटू कामगार संघटनेचे जिल्हा सरचिटणीस कॉ.गंगाधर गायकवाड यांनी केले आहे. दि.२७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी नंदीग्राम, देवगिरी आणि राज्य राणी एक्सप्रेस रेल्वेने नांदेड येथून निघायचे असून वेळेपूर्वी कामगार – कष्टकऱ्यांनी रेल्वे स्टेशन येथे उपस्थित रहावे निवेदन सीटू कामगार संघटनेच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आले आहे.