हिमायतनगर, दत्ता शिराणे। क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांनी जंगल दर्याखोर्यात वास्तव्य करणाऱ्या आदिवाशी समाज बांधवात जागृती निर्माण करण्याचे काम केले. आपल्या न्याय हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा भगवान बिरसा मुंडा यांनी दिली. त्यांच्या आदर्शवत कार्याची प्रेरणा आजच्या युवा पिढीने घेऊन समाजात जनजागृतीचे काम करावे. असे, अवाहन आदिवासी विकास विभाग राज्य सदस्य तथा अमरावती विभागीय अध्यक्ष तुकाराम अडबलवाड यांनी केले.
सरसम बु. येथे ता. १५ बुधवार ला क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांची १४८ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी आयोजित कार्यक्रमात अडबलवाड बोलत होते. क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या नियोजित पुतळ्याच्या जागेवर जेष्ठ नागरिक लालबाजी अडबलवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी डिजिटल नामफलकाचे अनावरण ही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
पुढे बोलतांना टि. आर. अडबलवाड म्हणाले की, छत्रपती शिवाजीमहाराज, शाहूमहाराज, महात्मा ज्योतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, तंट्या भिल्ल यांच्यासह तमाम जाती धर्मांच्या महापुरुषांनी समाजाला जागृत करण्याचे काम केले असून, महापुरुषांच्या विचारांची पेरणी करण्याचै काम तरूणाने हातात घ्यावे, आदिवाशी समाज शिक्षणापासून आजही कोसोदुर आहे. जुन्या अनिष्ठ चाली रीतीना दुर ठेवून आदिवासी समाज बांधवानी शिक्षणाची कास धरावी. असे अडबलवाड यांनी सांगीतले. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन सहशिक्षक रमेश ढेमकेवाड यांनी केले. तर अभार अभिमन्यू वडनपवाड सरसमकर यांनी मानले.
यावेळी उपसरपंच अँड. अतुल वानखेडे, विपूल दडेवाड, मारोतराव मोरे, सखाराम ठाकूर, मारोती सुर्यवंशी, नामदेव मोकासवाड, अमोल कांबळे, हिमायतनगर तालूका पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्ता शिराणे, माजी अध्यक्ष गोविंद गोडसेलवार, संतोष डाके, बिच्चेवार, हरीश गिरी, संभाजी बनसोडे, साहेबराव गाडे, गणपत शिराणे, कचरू कांबळे, मोहन राहूलवाड, सखाराम मंडलवाड, नारायण पसलवाड, प्रशांत मंडलवाड, बालाजी मंडलवाड, आदींसह अनेकांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत मंडलवाड, गणेश तोटेवाड, शुभम मंडलवाड, संदिप ढेमकेवाड, विकास ताडेवाड, स्वप्नील पसलवाड, अरविंद बोईनवाड, पवन बास्टेवाड, शिवाजी बंडेवाड, भिमराव अलबडवाड, अनिकेत बोरेवाड आदिंनी प्रयत्न केले.