नांदेडलाईफस्टाईल
माजी आमदार आष्टीकर यांना मात्रशोक; गंगाबाई आष्टीकर यांचे दुःखद निधन

हिमायतनगर। माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मातोश्री गंगाबाई आष्टीकर यांचे आज सकाळी 6 वाजता वर्धापकाळाने निधन झाले आहे.
हदगाव हिमायतनगर मतदार संघाचे भाग्यविधाते स्वर्गीय बापूराव पाटील आष्टीकर यांच्या पत्नी तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख माजी आमदार नागेश पाटील यांचे मातोश्री गंगाबाई बापुरावजी अष्टीकर यांचे वर्धापकाळ आज सकाळी 6 वाजता निधन झाले.
हदगाव येथील माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या निवासस्थानी दुपारी 2 वाजून 30 मिनिटपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे, त्यानंतर मूळ गाव आष्टी येथे नेण्यात येईल, त्यानंतर बुधवारी सायंकाळी 4 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो हीच भावपूर्ण श्रद्धांजली.
