हिमायतनगरात रक्तदान शिबिरातून छत्रपती शिवरायांना जयंती निमित्त अनेकांनी केलं वंदन
हिमायतनगर, अनिल मादसवार| श्रीराम मंदिराच्या उदघाटनानंतर जगभरात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात शिवजयंती साजरी केली जाते आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य अजरामर आहे, देव, धर्म आणी देश, हिंदवी स्वराज्य, भारत देश, या देशाचे पवित्र, या देशाच्या सनातनी धर्माच्या परंपरा, या देशाचे लालित्य, पालित्य, शिवराज्य, स्वराज्य आणि रामराज्य टिकवून आहे. ते फक्त आणि फक्त शिवाजी रांजेमुळे आहे. त्यांच्या कार्याला उजाळा देऊन हिमायतनगर शहरातील सार्वजनिक जयंती मंडळाच्या युवकांच्या पुढाकारातून भव्य अशी छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती आणण्यात आली असून, मूर्तीच स्वागत शालेय विद्यार्थ्यांनींनी लेझीम रैलीतून करण्यात आले आहे. तसेच युवकांनी रक्तदान करून छत्रपती शिवरायांना जयंती निमित्त वंदन केलं आहे. यावेळी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी देखील उपस्थित होऊन छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले.
जय भवानी…जय शिवाजी… नामाचा जयघोषात करत अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, महाराष्ट्राची अस्मिता, रयतेचे राजे, रण धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतं, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज योगिराज श्रीमंत श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा हिमायतनगर (वाढोणा) येथे दि.१९ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती (वाढोणा) च्या पुढाकारातून साजरी करण्यात आली. श्री परमेश्वर मंदिरासमोरील मैदानात ढोल ताशा आणि लेझीम पथकाच्या गजरात धुमधडाक्यात जयंती उत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी आवर्जून उपस्थिती लावली आणि छत्रपती शिवाजी राजेंच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहाराने करून अभिवादन केले. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराला देखील सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी याप्रसंगी महावीरचंद श्रीश्रीमाळ, डॉ.राजेंद्र वानखेडे, डॉ.शेषेराव चव्हाण, डॉ.गणेश कदम, डॉ आनंद माने, डॉ.दिलीप माने, डॉ.दिगंबर वानखेडे, शंकर पाटील, आनंद भंडारे, प्रथम नगराध्यक्ष अखिल भाई, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे, तालुकाध्यक्ष रामभाऊ ठाकरे, तालुकाध्यक्ष गजानन सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष गजानन चायल, तालुकाध्यक्ष विठ्ठल ठाकरे, आशिष सकवान, सुभाष शिंदे, संजय माने, व्यंकटेश दमकोंडवार, गोविंद शिंदे, रामभाऊ सूर्यवंशी, वामनराव पाटील वडगावकर, उदय देशपांडे, विलास वानखेडे, रणखांब सर, परमेश्वर तीप्पणवार, मुन्ना शिंदे, मोहन ठाकरे, गजानन हरडपकर, बाळू गांजरे, हरडपकर सर, पंडित ढोणे, दशरथ हेंद्रे, सुनील दमकोंडवार, यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. जयंतीस्थळी अनेक मान्यवर शिवप्रेमींनी भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त प्रतिमेस अभिवादन करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी शहरासह ग्रामीण भागातील युवकांनी डोक्यावर फेटे, वाहनाला छत्रपतींची प्रतिमा असलेले भगवे ध्वज बांधून सहभागी झाले. शहरात लावण्यात आलेले भगवे झंडे, पताका छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्तीचे आगमन झाल्यानंतर करण्यात आलेली पुष्पवृष्टी, रक्तदान आणि छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून मुजरा करण्यात आला. यावेळी जय भवानी.. जय शिवाजी… तुमचा आमच नातं काय जय जिजाऊ… जय शिवराय… अश्या नामघोष करण्यात आला. एकूणच आजच्या शिवजयंती सोहळ्यामुळे सर्वत्र भगवेमय वातावरण निर्माण झाले होते. शिव जन्मोत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी सार्वजनिक शिवजयंती मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांनी परिश्रम घेतले. जयंती दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक डी.एस.जऱ्हाड यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावला होता.
२२ रोजी निघणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची भव्य शोभायात्रा
आज शवजन्मोत्सव सोहळ्याच्या मुहूर्तावर हिमायतनगर येथे छत्रपती संभाजी नगरहून छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ पुतळा आणण्यात आला आहे. या पुतळ्याचे अभिषेक पूजनाने दिनांक २२ फेब्रुवारी रोजी अनावरण केले जाणार आहे. त्या निमित्ताने शहरातून भव्यदिव्य अशी शोभायात्रा काढली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.