महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटना आयोजित,पद्मशाली समाजातील गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा, 7 जुलै रोजी..
नांदेड l पद्मशाली समाज बांधवांना विनंती करण्यात येते की दिनांक 7जुलै 2024 वार रविवार रोजी शुभारंभ मंगल कार्यालय, आय.टी.आय परिसर लेबर कॉलनी नांदेड येथे महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटनेतर्फे प्रतिवर्ष प्रमाणे (वर्ष 11 वे) याही वर्षी भव्य अशा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे, व करियर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. असुन या सोहळ्यात राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास माजी आमदार कैलास सेठ गोरंट्याल (जालना), रामेश्र्वर सब्बनवाड (सहाय्यक सचिव- मंत्रालय रस्ते महामार्ग,नविदिल्ली ) अशोक इंदापुरे (निमंत्रक विशेष मागास प्रवर्ग,सोलापूर) पायलट ऋषिकेश जगन्नाथ बिंगेवार(दिल्ली), यांच्यासह अनेक प्रशासकीय नवनियुक्त ,उच्चपदस्त अधिकारी व अनेक मान्यवर उपस्थतीत राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
पद्मशाली समाजातीलया वर्षी सेवनिवृत, पदोन्नत, नवनियुक्त कर्मचारी बांधव यांनी नोंद करावी तसेच ज्या विद्यार्थ्यांना दहावी व बारावी 70 टक्के च्या वर गुण असलेल्या विद्यार्थ्यांनी, नीट JEE , 5वी, 8वी, शिष्वृत्ती धारकांवर,नवोदय पात्र, यांनी आपले गुणपत्रक 2 जुलै 2024 पर्यंत म. रा. पद्मशाली कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी व समाज संघटनेच्या पदाधकाऱ्यांशी सपंर्क करुन आपल्या पाल्याची नोंदनी करुन व कार्यक्रमास सहकुटुंब उपस्थीत राहून या सामाजिक कार्यात सहकार्य करुन कार्यक्रम यशस्वी करावे.
असे आव्हान संघटनेचे अध्यक्ष नागभुषण दुर्गम, कार्याध्यक्ष शिवाजी अन्नमवार,उपाध्यक्ष प्रा.शंकरराव कुंटुरकर, विजय वडपल्ली सचिव संतोष गुंडेटवार, जिल्हाध्यक्ष विजय चरपिलवार,गणेश भुसा, नरसिंग गुर्रम, गणेश कोकुलवार, नरसिंमलू वंगावार, नारायण अडबलवार, सूर्यकांत दासरवार, रामदास शेकापुरे,नाथा गंगुलवार , संतोष ताडेवार, नरसिंग जिडेवार, तेलेवार ,राजकुमार दाचावार, हणमंत गुरुपवार, नागोराव येवतीकर, राम चीलकेवार, सचिनरामदीनवार, हिराप्रकश बोडावार, नागेश कैरमकोंडा, दिलीप मदास, गणेश शिवरात्री, श्रीनिवास चन्नावार, राजेंद्र हसनपल्ली, मलेष बल्ला, सतपाल मेका,वेंकटेश मुलुकवार, उमाकांत म्यlकलवार, नागभूषन सामलेट्टी व समस्त महाराष्ट्र राज्य पद्मशाली कर्मचारी संघटना पदाधिकारी यांनी केले.